मोदी सरकारने काश्मीर विकायला काढलाय; ओमर अब्दुल्लांची खरमरीत टीका
जम्मू-काश्मीरमध्ये आता राज्याबाहेरील व्यक्तीही जमीन खरेदी करु शकणार आहेत. | Omar Abdullah
श्रीनगर: मोदी सरकारने जमीन खरेदी कायद्यात सुधारण करून जम्मू-काश्मीर विकायला काढलाय, अशी खरमरीत टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केली. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जम्मू-काश्मीरमधील जमीन खरेदी-विक्री व्यवहारासंबंधीच्या नियमांत करण्यात आलेल्या सुधारणांचा त्यांनी निषेध केला. (Omar Abdullah on Kashmir amendment in land laws)
हे बदल अस्वीकारार्ह आहेत. बिगरशेती जमिनींसाठी अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल) देण्याचीही गरज नाही. तर कृषी जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रियाही सोपी करण्यात आली आहे. एकूणच केंद्र सरकारने आता जम्मू-काश्मीर विकायला काढला आहे. त्यामुळे आता लहान जमिनीच्या मालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे, अशी टीका ओमर अब्दुल्ला यांनी केली.
Unacceptable amendments to the land ownership laws of J&K. Even the tokenism of domicile has been done away with when purchasing non-agricultural land & transfer of agricultural land has been made easier. J&K is now up for sale & the poorer small land holding owners will suffer.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) October 27, 2020
जम्मू-काश्मीरमध्ये आता राज्याबाहेरील व्यक्तीही जमीन खरेदी करु शकणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मंगळवारी याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली होती. या अधिनियमानुसार आता जम्मू-काश्मीरमध्ये अन्य राज्यातील नागरिकांना कारखाना, घर किंवा दुकानासाठी जमीन खरेदी करता येईल.
केंद्राच्या या निर्णयामुळे आगामी काळात काश्मीरमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील स्थानिक रहिवाशांनाच राज्यात जमीन खरेदी करता येत असे. मात्र, आता बाहेरच्या लोकांनाही याठिकाणी जमीन घेण्याची परवानगी मिळाली आहे.
जम्मू-काश्मीरबाबत मोदी सरकारचे मोठे निर्णय पंतप्रधान मोदी यांनी धाडसी निर्णय घेत गेल्यावर्षी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवलं आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला.
मेहबुबा मुफ्तींच्या वक्तव्यानंतर वादंग जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा दिला जात नाही तोपर्यंत मी तिरंगा हातात धरणार नाही, असे वक्तव्य ‘पीडीपी’च्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केले होते. त्यांनी जम्मू काश्मीरचा जुना ध्वज परत देण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याविरोधात जम्मू काश्मीरमध्ये त्यांना चांगलाच विरोध होताना दिसतोय. या वक्तव्याचा निषेध करत ‘पीडीपी’च्या तीन प्रमुख नेत्यांनी पक्षाचा राजीनामाही दिला.
संबंधित बातम्या:
‘देशभक्तीच्या भावनेचा अनादर मान्य नाही’, मेहबुबा मुफ्तींवर नाराज PDP नेत्यांचा राजीनामा
लडाख स्वायत्त विकास परिषदेच्या निवडणुकीत भाजप विजयी, पण काँग्रेसला फायदा!
(Omar Abdullah on Kashmir amendment in land laws)