AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pahalgam Terror Attack : हातात AK-47, पेहेलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर

Pahalgam Terror Attack : पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या अतिरेक्याचा पहिला फोटो समोर आला आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस मुगल रोडवर तैनात आहेत.

Pahalgam Terror Attack : हातात AK-47, पेहेलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर
pahalgam terror attackers photo
| Updated on: Apr 23, 2025 | 12:12 PM
Share

जम्मू-काश्मीरमधील पेहेलगाम येथे मंगळवारी दुपारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पेहेलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या एका अतिरेक्याचा फोटो समोर आला आहे. घटनास्थळावरचा हा फोटो आहे. या दहशतवाद्याच्या हातात बंदूक दिसत आहे. फोटोमध्ये दहशतवाद्याचा चेहरा दिसत नाहीय. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधसाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे. NIA ची टीम श्रीनगमरध्ये पोहोचली आहे. फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झाली आहे. आर्मी, सीआरपीएफ, एसओजी, जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस मुगल रोडवर तैनात आहेत. दरम्यान सुरक्षा यंत्रणांकडून पेहेलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांच स्केच जारी करण्यात आलं आहे.

पहलगाममध्ये सुरक्षा पथकांच ऑपरेशन संपल्यानंतर एनआयएची टीम लोकेशवर पोहोचली आहे. पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांचे  मृतदेह पहलगाम हॉस्पिटलमधून श्रीनगरला पाठवण्यात आले आहेत. पहलगामच्या बैसारन खोऱ्यात हा हल्ला झाला. यात लोकांना निवडून-निवडून लक्ष्य करण्यात आलं.

भारतात दाखल होताच विमानतळावर घेतली बैठक

या हल्ल्याची बातमी समजल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय सौदी अरेबिया दौरा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले. दिल्ली विमानतळावर आज सकाळी उतरताच त्यांनी एअरपोर्टवर एक बैठक घेतली. या बैठकीला NSA अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.

अमित शाह-राहुल गांधींमध्ये चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल रात्रीच श्रीनगरमध्ये दाखल झाले. आज सकाळी त्यांनी घटनास्थळाला पेहेलगामला भेट दिली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पेहेलगाम हल्ल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा केली.

महाराष्ट्रातील किती पर्यटकांचा मृत्यू ?

सध्या देशात शाळांना उन्हाळी सुट्टया सुरु आहेत. शिवाय उकाडा देखील प्रचंड आहे. त्यामुळे पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी म्हणून काश्मीरला पसंती देतात. काल पेहेलगाममध्ये देशभरातून पर्यटक आले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी सुनियोजित पद्धतीने हल्ला केला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.