कुस्तीपटूंचे आंदोलन चिरडले; आंदोलनातील ‘या’ खेळाडूंवरच FIR दाखल
कुस्तीपटूंचा विरोध अद्याप संपलेला नाही आणि दिल्ली पोलिसांनी त्यांना सोडताच ते जंतरमंतरवर परतणार असल्याचेही साक्षी मलिकने सांगितले होते.
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी रविवारी संध्याकाळी उशिरा जंतर-मंतर येथील घटनेसंदर्भात एफआयआर दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया तसेच निषेध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांविरुद्ध 147, 149, 186, 188, 332, 353, पीडीपीपी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूतर संसद भवनाच्या उद्घाटनावेळी रविवारी कुस्तीपटू आणि खेळाडूंच्या उपस्थितीत महिला महापंचायत आयोजित करण्यात आली होती.
रविवारी कुस्ती शौकिनांनी मोर्चा काढत असताना यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. तसेच आंदोलनस्थळावरून पैलवानांचे तंबूही पोलिसांनी हटवले आहेत.
आंदोलन स्थळावरून मिळालेल्या माहितीवरून बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कुस्तीपटूंच्या या आंदोलनाच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पैलवानांच्या आंदोलनाचे ज्या ज्या व्यक्तीने आयोजन केले होते,
त्या सर्वांना आंदोलन स्थळावरून आता परत पाठवण्यात आले आहे. आंदोलन करणाऱ्या खेळाडूंविरोधात एफआयआर नोंद करण्यात आल्यानंतर विनेश फोगट यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे, त्यांनी ट्विट करत पोलीस यंत्रणेवर आणि सरकावर जोरदार प्रतिहल्ला केला आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की, ‘ ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांविरोधातच एफआयआर नोंदवायला दिल्ली पोलिसांना सात दिवस लागतात,
आणि शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आमच्यासारख्या खेळाडूंवर गुन्हा दाखल करायला सात तासही लागत नाहीत. त्यामुळे आता या देशात हुकुमशाही सुरु झआली आहे असा गंभीर आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.
या देशातील सरकार सरकार आपल्या खेळाडूंना कशा प्रकारची वागणूक देते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे या खेळाडूंच्या आंदोलनामुळे आता नवा इतिहास लिहिला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
दिल्ली पोलिसांनी रविवारी कडक कारवाई केली तेव्हा पासून दिल्ली पोलिसांवर जोरदार टीका केली जात आहे. या प्रकरणानंतर काही तासांतच कुस्तीपटूंनी लढत सुरू ठेवण्याची घोषणा केली होती.
कुस्तीपटूंचा विरोध अद्याप संपलेला नाही आणि दिल्ली पोलिसांनी त्यांना सोडताच ते जंतरमंतरवर परतणार असल्याचेही साक्षी मलिकने सांगितले होते.
रविवारी ‘महिला महापंचायत’ दरम्यान, नवीन संसद भवनाकडे जात असताना दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या पैलवानांमध्ये विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि इतर विरोधक कुस्तीपटूंचाही यामध्ये समावेश असल्याचे दिसून येत आहे.