पुंछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद
जम्मू -काश्मीरच्या पीर पंजाब रेंजमधील राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईदरम्यान लष्कराचे ज्युनिअर कमिशन ऑफिसर (जेसीओ) आणि 4 जवान शहीद झाले आहेत.
नवी दिल्ली : जम्मू काश्मिरमधून एक दु:खद घटना समोर येतीय. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारताच्या एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यासह चार जवानांना वीरमरण आलंय. जम्मू -काश्मीरच्या पीर पंजाब रेंजमधील राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेल्या कारवाईदरम्यान लष्कराचे ज्युनिअर कमिशन ऑफिसर (जेसीओ) आणि 4 जवान शहीद झाले आहेत.
A junior commissioned officer (JCO) & four soldiers killed in action during a counter-terrorist operation in the Rajouri sector in the Pir Panjal ranges: Sources
— ANI (@ANI) October 11, 2021
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना पुंछ सेक्टरमध्ये दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कराचे जवान तेथे पोहोचले आणि शोधमोहीम सुरु केली. या दरम्यान दहशतवाद्यांकडून लष्करावर गोळीबार सुरू करण्यात आला. या दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान, एक कनिष्ठ कमिशन्ड अधिकारी (जेसीओ) आणि लष्कराचे 4 जवान चकमकीत शहीद झाले.
याशिवाय जम्मू -काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली, ज्यात लष्कराने एक दहशतवादी ठार केला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी जिल्ह्यातील वेरीनाग भागातील खगुंड येथे घेराव आणि शोधमोहीम सुरू केली.
दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्याने ऑपरेशन चकमकीत बदलले. गोळीबारालाही जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला, तर एक पोलीस जखमी झाला, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
किंबहुना दहशतवाद्यांनी काश्मिर खोऱ्यात अल्पसंख्यांकांची हत्या केल्यानंतर लष्कराने शोधमोहीम तीव्र केली आहे. नुकत्याच झालेल्या चकमकीत लष्कराने एक दहशतवादी ठार केला, तर एक पाकिस्तानी दहशतवादी पळून गेला. या भागात रविवारी जम्मू -काश्मीर पोलिसांनी मोहम्मद शफी लोनच्या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या 4 साथीदारांना अटक केली.
‘शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल तर एक दिवसाचं उत्पन्न आंदोलनासाठी पाठवा’, मनसेचं मलिकांना प्रत्युत्तर https://t.co/55aSHzKOUI @nawabmalikncp @NCPspeaks @MNSAmeyaKhopkar @mnsadhikrut @BJP4Maharashtra #Ameykhopkar #NawabMalik #NCP #MNS #MaharashtraBand #LakhimpurKheri #Lakhimpur
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 11, 2021