JEE Main 2021 April Postponed : जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर, विद्यार्थ्यांच्या मागणीला यश
JEE Main 2021 April Postponed : जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या मागणीला यश आलं आहे.
JEE Main 2021 April Postponed नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राची परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रकाप्रमाणं जेईई मेन 2021 एप्रिल सत्राची परीक्षा 27 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत घेण्यात येणार होती. जेईई मेन परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. (Jee Main Exam April 2021 postponed due to corona virus outbreak)
विद्यार्थ्यांकडून परीक्षा स्थगित करण्याची मागणी
भारतात कोरोना विषाणू संसर्गाच्या नव्या लाटेमुळे आता दररोज 2 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोना विषाणू संसर्गामुळे सीबीएसईच्या बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. देशातील इतर बोर्डांच्या परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.जेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा 27 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान होणारी परीक्षा लांबणीवर टाकावी, अशी मागणी विद्यार्त्यांनी केली होती. जेईई मेनच्या विद्यार्थ्यांकडून #POSTPONEJEEMains2021 ही मोहिम राबवली गेली होती. परीक्षा लांबणीवर टाकून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आला आहे.
अॅडमिट कार्ड जाहीर होणार?
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)कडून जेईई मेन परीक्षा एप्रिल सत्राचे अॅडमिट कार्ड आता नवीन तारीख जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध होतील. जेईई मेन एप्रिल सत्रामध्ये फक्त एका पेपरचे आयोजन केले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना बीई / बीटेक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे. ते अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन पेपर 1 ची परीक्षा देतील.
NEET PG परीक्षा लांबणीवर
वाढत्या कोरोना विषाणू संसर्गामुळे 18 एप्रिलला होणारी NEET PG परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे जेईई मेन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केलेली.
नेट परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी
नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षाही इतर परीक्षांप्रमाणे पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 2 मे ते17 मे दरम्यान नेटची परीक्षा होणार आहे. दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( एनटीए ) मार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेतली जाते. मात्र, देशातला आणि राज्यातला वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.
Looking at the present situation of the #COVID19 pandemic, @DG_NTA has been decided to postpone the JEE (Main) – 2021 April Session
Revised dates for the JEE (Main) – 2021 April session will be announced later on and at least 15 days before the examination@airnews_mumbai pic.twitter.com/dTkT72kxkN
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) April 18, 2021
संबंधित बातम्या: