त्यांना पोलीस महासंचालक पदावरुन हटवलं तर थेट IPS अधिकाऱ्यानं नोकरी सोडली, म्हणाले, थेट गावी जाऊन शेती करतो !
जवळपास 11 महिने त्यांनी झारखंडच्या पोलीस महासंचालकपदाचा कारभार सांभाळला. | jharkhand dgp m v rao
रांची: झारखंडचे माजी पोलीस महासंचालक एम.व्ही. राव हे सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने त्यांना अचानक महासंचालक पदावरुन दूर केले होते. त्यानंतर एम. व्ही. राव यांनी पोलिसांची नोकरीच सोडण्याचा निर्णय घेतला. ही नोकरी सोडून ते आंध्र प्रदेशातील आपल्या गावी गेले आणि आता त्याठिकाणी शेती करत आहेत. (Former incharge of jharkhand dgp mv rao take vrs doing farming)
एम.व्ही. राव हे एक कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जायचे. जवळपास 11 महिने त्यांनी झारखंडच्या पोलीस महासंचालकपदाचा कारभार सांभाळला. त्यांच्या निवृत्तीसाठी अवघे सहा महिनेच शिल्लक होते. मात्र, झारखंड सरकारने त्यापूर्वीच एम.व्ही. राव यांच्याकडून महासंचालकपदाचा कार्यभार काढून तो नीरज सिन्हा यांच्याकडे सोपविला.
एम.व्ही. राव यांची कारकीर्द
एम.व्ही. राव हे त्यांच्या कार्यक्षमता आणि धडाडीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी आतापर्यंतच्या कारकीर्दीत बिहारमध्ये वरिष्ठ पोलीस अधिक्षकापासून ते पोलीस महासंचालक अशा अनेक भूमिका पार पाडल्या. आपल्या 34 वर्षांच्या कारकीर्दीत एम.व्ही. राव यांनी अनेक मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात काम केले. झारखंडमध्ये सोरेन सरकारच्या काळातही एम.व्ही. राव अनेक महत्त्वाच्या पदांवर होते.
राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात
झारखंड सरकारने एम.व्ही. राव यांना पोलीस महासंचालक पदावरून का दूर केले, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांशी याबद्दल बोलायला नकार दिला. मात्र, ‘आज तक’शी बोलताना त्यांनी बिहारचे विशेष कौतुक केले. त्यांच्या काळातील मर्यादित मनुष्यबळ, खटारा गाड्या आणि जुनी शस्त्रे अशा अन्य विषयांवर बोलणे एम.व्ही. राव यांनी पसंत केले.
संबंधित बातम्या:
जनरेशनला नावं ठेवताना बाबा कायम मोबाईलमध्येच, विश्वास नांगरे पाटलांच्या मुलीकडून ‘पोलखोल’
Special Story | जिगरबाज IPS ऑफिसर विश्वास नांगरे पाटील यांचं अरेंज ते लव्ह मॅरेज
(Former incharge of jharkhand dgp mv rao take vrs doing farming)