Jharkhand ED raid: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्ती प्रेम प्रकाशना अटक; घरातून जप्त करण्यात आल्या होत्या दोन AK-47

अवैध खाण घोटाळ्यात प्रेम प्रकाश यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांच्यावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी ईडीने त्यांच्या रांचीतील घरातून दोन AK-47 रायफल, 60 काडतुसे आणि दोन मासिके जप्त करण्यात आली होती.

Jharkhand ED raid: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे निकटवर्ती प्रेम प्रकाशना अटक; घरातून जप्त करण्यात आल्या होत्या दोन AK-47
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 9:43 AM

रांचीः झारखंडमधील अवैध खाणकामप्रकरणी (illegal mining) ईडीकडून प्रेम प्रकाश यांना अटक करण्यात आली आहे. मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत ही कारवाई केली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले आहे. त्यांना अटक करण्याआधी बुधवारी प्रेम प्रकाश (Prem Prakash) यांच्या घरावर छापा टाकून त्यांच्या घरातून दोन AK-47 रायफल जप्त करण्यात आल्या होत्या. झारखंडमधील बेकायदेशीर खाण प्रकरणात मनी लाँड्रिंगची चौकशी करणाऱ्या ईडीकडून बुधवारी झारखंड, बिहार, तामिळनाडू, दिल्ली आणि एनसीआरमध्ये छापेमारी करण्यात आली होती. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Jharkhand Chief Minister Hemant Soren) यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा आणि त्यांचे जवळचे सहकारी बच्चू यादव यांच्या चौकशीनंतर त्यांच्यावर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर या दोघांनाही ईडीकडून करण्यात आली होती.

प्रेम प्रकाशच्या घरात सापडल्या दोन AK-47

अवैध खाण घोटाळ्यात प्रेम प्रकाश यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून त्यांच्यावर छापा टाकण्यात आला होता. त्यावेळी ईडीने त्यांच्या रांचीतील घरातून दोन AK-47 रायफल, 60 काडतुसे आणि दोन मासिके जप्त करण्यात आली होती.

प्रेम प्रकाश यांच्या घरी रायफल कशा?

प्रेम प्रकाश यांच्या घरी रायफल सापडल्यानंतर झारखंड पोलिसांनी सांगितले की, प्रेम प्रकाश यांच्या घरी सापडलेल्या Ak-47 रायफल्स दोन पोलीस कॉन्स्टेबलच्या असून त्यांना आता निलंबित करण्यात आले आहे. हे दोन्ही पोलीस हवालदार रांची जिल्हा दलात काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र 23 ऑगस्ट रोजी ड्युटी संपवून ते घरी परतत असताना मुसळधार पावसामुळे काही वेळ प्रेमप्रकाश यांच्या घरी थांबले होते, त्यावेळी प्रेम प्रकाश य़ांच्या घरातील कर्मचाऱ्याची ओळख झाल्यावर रायफल कपाटात ठेवण्यात आली होती, त्यावेळी कपाटाची चावीही त्यांनी आपल्याकडे घेतली होती.

दोन पोलील हवालदार निलंबित

त्यानंतर सकाळी दोन्ही हवालदार आपल्या रायफल घेण्यासाठी प्रेम प्रकाशच्या घरी आले होते, परंतु त्यांना तेथे ईडीचे छापे सुरू झाल्याचे आढळले. अशा स्थितीत त्यावेळी भीतीपोटी त्यांनी आपली रायफल घटनास्थळावरून घेतली नाही. पण तपासादरम्यान एजन्सीने त्या दोन AK-47 जप्त करण्यात आल्या असून याप्रकरणी दोन्ही पोलीस हवालदारांना निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.