AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आले मुख्यमंत्र्यांच्या मना, तिथे पेट्रोल स्वस्ताईचा जमाना, झारखंडमध्ये पेट्रोलचे दर 25 रुपयांनी घटवले, अटी लागू

देशभरात इंधनाचे दर प्रचंड वाढलेले असले तरी नव्या वर्षात झारखंडमध्ये पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्याबाबतची घोषणा केली आहे.

आले मुख्यमंत्र्यांच्या मना, तिथे पेट्रोल स्वस्ताईचा जमाना, झारखंडमध्ये पेट्रोलचे दर 25 रुपयांनी घटवले, अटी लागू
पेट्रोल-डिझेल
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 4:54 PM

रांची: देशभरात इंधनाचे दर प्रचंड वाढलेले असले तरी नव्या वर्षात झारखंडमध्ये पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्याबाबतची घोषणा केली आहे. येत्या 26 जानेवारीपासून झारखंडमध्ये बीपीएल कार्ड धारकांना पेट्रोल- डिझेल 25 रुपयांनी स्वस्त देण्यात येणार आहे.

झारखंडमध्ये पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची वारंवार मागणी केली होती. असोसिएशनने पेट्रोल- डिझेलवरील व्हॅट 5 टक्क्याने कमी करण्याची मागणी केली होती. व्हॅटचा दर 22 टक्क्यावरून 17 टक्के करावा. त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल. झारखंडच्या बाजूलाच असलेल्या उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशात डिझेलच्या किमती कमी केल्या आहेत. त्यामुळे झारखंडमधील वाहनचालक शेजारील राज्यात जाऊन डिझेल भरत आहेत. त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान होत आहे, असं या असोसिएशनने म्ह्टलं होतं.

अडीच लाख कुटुंबांची उपजिवीका

पेट्रोलियम डिलर्सनी राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना चिठ्ठी लिहिली होती. तसेच अर्थ मंत्र्यांशी चर्चाही केली होती. मात्र, त्याची अद्यापही दखल घेतली गेली नाही, असं असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सिंह यांनी सांगितलं. अर्थ मंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांना मागण्यांचं निवेदन दिलं होतं. मात्र, आमच्या मागण्यांवर विचार केला गेला नाही. झारखंडमध्ये 1350 पेट्रोल पंप आहेत. त्यावर अडीच लाखाहून अधिक कुटुंबाचं उदरनिर्वाह अवलंबून आहे. व्हॅटच्या उच्च दरांमुळे व्यवसायावर परिणाम होत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अनेक शहरात पेट्रोलची शंभरी

देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेले असून, दररोज सुमारे 35 पैशांनी महाग होत आहे. काही शहरांमध्ये डिझेलचा दरही 100 रुपयांवर पोहोचला. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक उत्पादन शुल्क लावते. गेल्या वर्षी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 19.98 रुपयांवरून 32.9 रुपये प्रति लिटर करण्यात आले होते. त्याचप्रमाणे डिझेलवरील शुल्क 31.80 रुपये प्रति लीटर करण्यात आले.

संबंधित बातम्या:

Cheating : अवघ्या 3 महिन्यात महिलेनं दोन बाळांना दिला जन्म! काय आहे प्रकरण?

पार्टी विथ डिफरन्स ! भाजपचा नेता म्हणतो, तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला 50 रुपयात लीटरभर दारु देतो !

खोदता खोदता पहाड सापडे? आता जैनच्या कन्नौजच्या घरातून 19 कोटी रोख सापडले, 23 किलो सोने

'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी
'तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेट इतकेही नाही' - असदुद्दीन ओवैसी.
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे
20 ते 22 तास चालून बैसरन खोऱ्यात पोहोचले; एनआयएच्या तपासात मोठे खुलासे.
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.