बंगल्यात  2 कोटी रोख रक्कम, 100 कोटी बेहिशोबी संपत्ती…काँग्रेस आमदाराच्या घरात सापडले घबाड

आयकर विभागाने झारखंडमध्ये टाकलेल्या धाडीत मिळालेली रक्कम ही मशीन आणून मोजावी लागली.

बंगल्यात  2 कोटी रोख रक्कम, 100 कोटी बेहिशोबी संपत्ती…काँग्रेस आमदाराच्या घरात सापडले घबाड
Follow us
| Updated on: Nov 08, 2022 | 5:45 PM

नवी दिल्लीः झारखंडमध्ये सध्या राजकीय परिस्थिती वेगवेगळ्या घटनांमुळे ढळमळीत झाली आहे. त्यातच काँग्रेस आमदारांसाठी तर ही परिस्थिती अजिबातच ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये झारखंडमधील काँग्रेसचे तीन आमदार नोटांच्या गठ्ठ्यासह पकडले गेले होते. तर दुसरीकडे, शुक्रवारी आयकर विभागाने काँग्रेसच्या दोन आमदारांसह काही व्यावसायिकांच्या जवळपास 50 ठिकाणी छापेही टाकण्यात आले होते. या छाप्यात आयटी पथकाला सुमारे दोन कोटी रुपयांची रोकड मिळाली होती.

या नोटा मोजण्यासाठी आयकर विभागाला मशीन आणून मोजावे लागले होते. त्याच वेळी आयटी टीमने 100 कोटींहून अधिकची बेनामी संपत्ती आणि गुंतवणूक असल्याचेही शोधून काढले.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने एक निवेदन जाहीर करुन कर चुकविणाऱ्यांच्या विरोधात अनेक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला गेला आहे.

4 नोव्हेंबर रोजी आयटीकडून काँग्रेसचे आमदार कुमार जयमंगल उर्फ ​​अनूप सिंह आणि प्रदीप यादव यांच्यावर संपत्तीवर टाच आणली होती. त्यावेळी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे तपासात उघड करण्यात आले.

सीबीडीटीच्या आयटी टीमने कारवाई करत असताना काही व्यावसायिकांविरोधातही कारवाई सुरू करण्यात आली. या कारवाईमध्ये रांची, गोड्डा, बर्मो, दुमका, जमशेदपूर, झारखंडमधील चाईबासा, बिहारमधील पाटणा, हरियाणातील गुरुग्राम, पश्चिम बंगालमधील कोलकाता यासह 50 ठिकाणी छापेमाी करण्यात आली होती.

सीबीडीटीने सांगितले की, हे सर्व लोहखनिज उत्खनन, लोह उत्पादन, कोळसा व्यापार, वाहतूक या उद्योगात गुंतले असल्याची त्यांनी माहिती दिली.

व्यावसायिकांवर छापेमारी करण्यात आल्यानंतर त्यामध्ये दोन सहकारी हे राजकारणाशी संबंधित असल्याचे उघड झाले होते.

त्यामुळे कसून चौकशी केल्यानंतर कागदपत्रे आणि आयटीने डिजिटल स्वरुपाचे पुरावे शोधून काढले आहेत. या पुराव्यांच्या छाननीत असे दिसून आले की, या गटांनी करचुकवेगिरीच्या विविध पद्धतींचा अवलंब केला असल्याचे उघड केले आहे.

काँग्रेसचे आमदार कुमार जयमंगल यांनी ही छापेमारी राजकीय सूडबुद्धीने केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या सर्व संपत्तीचा तपशील देण्यात आला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.त्यामुळे ही कारवाई राजकीय आकस ठेऊन केली गेली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.