Asaram Bapu Covid : आसाराम बापूला कारागृहात कोरोना, आयसीयूत दाखल

रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची प्राथमिक तपासणी करुन त्याला आयसीयूमध्ये दाखल केले आहे. (Asaram Bapu Covid admitted in hospital)

Asaram Bapu Covid : आसाराम बापूला कारागृहात कोरोना, आयसीयूत दाखल
आसाराम बापू
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 7:40 AM

जयपूर : राजस्थानमधील जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात (Jodhpur central jail) तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूला (Asaram Bapu Covid Positive) कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली आहे. यामुळे त्याला उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Asaram Bapu Covid Positive admitted in hospital)

आसाराम बापू आयसीयूत

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम बापूला गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची सौम्य लक्षण दिसत होती. सोमवारी 3 मे रोजी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर बुधवारी 5 मे रोजी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याची प्रकृती बिघडली. त्याला महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची प्राथमिक तपासणी करुन त्याला आयसीयूमध्ये दाखल केले आहे. अद्याप त्यांच्या प्रकृतीविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

जोधपूर कारागृहात कोरोनाचा विस्फोट

जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात गेल्या महिन्यात कोरोनाचा विस्फोट झाला होता. या ठिकाणी जवळपास एक डझन कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर या सर्व कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांना तुरुंगातील दवाखान्यात विलगीकरणात ठेवण्यात आले होते. (Asaram Bapu Covid Positive admitted in hospital)

यापूर्वीही छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल 

दरम्यान या आधी 18 फेब्रुवारीला छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तपासणी केल्यानंतर काहीही गंभीर आढळले नाही. त्यामुळे दोन दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. या घटनेवेळी आसाराम बापूचे अनेक अनुयायी मोठ्या संख्येने जेलच्या बाहेर जमले होते. त्यामुळे त्यांना  बाहेर काढण्यासाठी पोलिसांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

राजस्थानातील कोरोना स्थिती काय?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राजस्थानलाही कोरोनाचा विळखा घातला आहे. राजस्थानमध्ये काल दिवसभरात 16 हजार 815 नवीन कोरोनाबाधित आढळले. ही मे महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात आढळलेली सर्वात कमी आकडेवारी आहे. तर दुसरीकडे काल दिवसभरात सर्वाधिक 17,022 रुग्ण बरे झाले आहेत. वैद्यकीय विभागाने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. तर कोरोना मृत्यूची संख्या चिंताजनक बनली आहे. बुधवारी राज्यात 155 संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यात एकूण मृत्यूची संख्या 5021 झाली आहे.

(Asaram Bapu Covid Positive admitted in hospital)

संबंधित बातम्या : 

Steroids मुळे कोरोना रुग्णांना गंभीर आजाराची भीती, डॉ. रणदीप गुलेरियांचा इशारा

Corona Virus Fact Check | प्राण्यांमार्फत कोरोनाचा संसर्ग होतो ?, केंद्र सरकारच्या ‘या’ माहितीनंतर सत्य आलं समोर, वाचा सविस्तर

कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेकांना 15 दिवसांमध्ये पुन्हा लागण, Immunity Escape म्हणजे काय ?

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.