AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : तब्बल 400 वर्षांनी गुरु आणि शनीचं मिलन, हा दुर्मिळ योग बघायला विसरु नका

| Updated on: Dec 22, 2020 | 12:24 AM

तब्बल 400 वर्षांनी गुरु आणि शनी या ग्रहांचं मिलन आपल्याला बघायला मिळणार आहे (Jupiter-Saturn Conjunction LIVE).

LIVE : तब्बल 400 वर्षांनी गुरु आणि शनीचं मिलन, हा दुर्मिळ योग बघायला विसरु नका

मुंबई : 21 डिसेंबर म्हणजेच आजच्या रात्री जर ढगाळ वातावारण नसेल तर तुम्हाला चांदण्या रात्री चंद्राच्या आजूबाजूला आणखी दोन ग्रहांचं मिलन बघायला मिळणार आहे (Jupiter-Saturn Conjunction LIVE). हे दोन ग्रह म्हणजे गुरु आणि शनी. विशेष म्हणजे 17 जुलै 1623 नंतर आज पहिल्यांदा हे दोन ग्रह एकमेकांच्या इतक्या जवळ येणार आहेत. या दोन ग्रहांमधील अंतर फक्त 0.1 डिग्री इतकं असेल.

या अनोख्या नजाऱ्याला तुम्ही सहज पाहू शकणार आहात. दोन्ही ग्रह चार शतकांनी जवळ येणार आहेत. असं जवळपास 400 वर्षांनंतर पहिल्यांदा घडत आहे. मात्र, त्यावेळी दोघांमधील अंतर 13 डिग्री इतकं होतं. मात्र, यावेळी हेच अंतर 0.1 डिग्री इतकं असणार आहे. विशेष म्हणजे हा नजारा आज नंतर थेट 15 मार्च 2080 रोजी बघायला मिळेल. त्यामुळे हा नजारा पाहण्याचा आपल्यासाठी सुवर्ण क्षण आहे.

अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या सौर मंडळात दोन मोठे ग्रह जवळ येणं हे फारसं दुर्मीळ नाही. पण गुरू हा ग्रह त्याच्या जवळ असणाऱ्या शनी ग्रहाजवळ प्रत्येक 20 वर्षानंतर जातो. पण या ग्रहांचं आता जवळ येणं खूप विशेष आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, त्यांच्या अंदाजे या दोन ग्रहांमधील अंतर फक्त 0.1 डिग्री असेल. जर हवामान अनुकूल असेल तर सूर्यास्तानंतर जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून तुम्ही हे ग्रहांचं मिलन पाहू शकता.

21 डिसेंबर 2020 रोजी म्हणजे आज दोन्ही ग्रह जवळ येणार आहेत. तो दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस मानला जातो. वँडरबिल्ट विद्यापीठातील खगोलशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड वेन्ट्रॉब याविषयी म्हणाले की, ही घटना एखाद्या व्यक्तीच्या जीवनात फक्त एकदाच घडते. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता हा क्षण सर्वांसाठी किती महत्त्वाचा आहे.

397 वर्षानंतर गुरू आणि शनी पुन्हा जवळ येणार

आश्चर्याची बाब म्हणजे जुलै 1623 मध्ये हे दोन्ही ग्रह इतके जवळ आले होते. पण सूर्याजवळ असल्यामुळे त्यांना पाहणं जवळजवळ अशक्य होतं. यानंतर, मार्चमध्ये 1226 पूर्वी, दोन ग्रह जवळ आले आणि ही घटना पृथ्वीवरुन पाहिली गेली होती.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Dec 2020 08:06 PM (IST)

    केंद्राच्या पाहणी दौऱ्यावर रोहित पवारांची टीका

    केंद्रीय पथकांच्या पाहणी दौऱ्यावर आमदार रोहित पवार यांची टीका. केंद्रीय पथक उद्या पंढरपुरात येणार आहे. मात्र, रुग्ण दगावल्यानंतर डॉक्टर येत असल्याची खोचक टिप्पणी रोहित पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारनं पथक पाठवण्यापेक्षा मदत पाठवावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.

  • 21 Dec 2020 08:03 PM (IST)

    पुणे : पिंपरीच्या सायन्स पार्कमध्ये खगोलप्रेमींची हा योग पाहण्यासाठी गर्दी

    गुरु आणि शनीचं मिलन पाहण्यासाठी पिंपरीच्या सायन्स पार्कमध्ये खगोलप्रेमींची गर्दी, गुरु आणि शनी ग्रहाचं मिलन पाहण्यासाठी खगोलप्रेमी उत्सुक

Published On - Dec 21,2020 8:10 PM

Follow us
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.