Jyotiba Phule Jayanti 2023 : या सरकारची मोठी घोषणा, महात्मा ज्योतिबा फुले जयंतीला सार्वजनिक सुट्टी
या राज्यात महात्मा फुले जयंतीची सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे, त्यामुळे त्या राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या आता 30 झाली झाले.
नवी दिल्ली : आज राज्यात महात्मा फुले जयंतीच्या (Jyotiba Phule Jayanti 2023) निमित्ताने सार्वजनिक सुट्टी (public holiday) जाहीर करण्यात आली आहे. त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला तशी माहिती दिली आहे. विशेष म्हणजे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) तिथल्या लोकप्रतिनिधींच्या मागण्या लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी तिथल्या सामान्य जनतेच्या भावना लक्षात घेतल्याने लोकांनी त्यांचे सोशल सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले आहे.
महिला व बालविकास मंत्री ममता भूपेश, राष्ट्रीय फुले ब्रिगेड संघ राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष दिनेश कुमार सैनी, नागौर परबतसर येथील लोकेश मलाकर यांच्यासह विविध सामाजिक संस्था आणि काही लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची मागणी राजस्थान सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याकडे केली होती. महात्मा जोतिबा फुले यांनी मुली आणि दलितांना शिक्षणाशी जोडण्यासाठी मोठ योगदान दिलं आहे. देशातून अस्पृश्यता नष्ट करण्यात आणि समाजाला सक्षम बनवण्यात सुध्दा त्यांची महत्त्वाची भूमिका होती. शेतकरी आणि शेतमजुरांच्या हक्कासाठी सुध्दा त्यांनी प्रयत्न केले आहेत.
देवनारायण जयंतीच्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला
मिळालेल्या माहितीनुसार, भगवान जयंतीची ऐच्छिक सुट्टीही राज्य सरकारने 28 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे आता राज्यातील सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या 30 आणि ऐच्छिक सुट्ट्यांची संख्या 20 झाली आहे. राज्यात अनेक सुट्ट्यांवर शासन निर्णय घेत आहे.
महात्मा फुले यांच्या जयंती दिवशी ‘मास्टर स्ट्रोक’
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री सचिन पायलट हे महात्मा फुले जयंतीच्या दिवशी उपोषणाला बसण्याची घोषणा केली. त्याचवेळी सरकारने सुट्टी जाहीर करुन सचिन पायलट यांची मोठी कोंडी केली आहे. विशेष म्हणजे अचानक सुट्टी जाहीर करण्यात आल्याने राजस्थान राज्यात राजकीय गोष्टींची अधिक चर्चा आहे. कारण यापुर्वी भाजप आंबेडकर जयंती सप्ताह साजरी करत आहे. अशा स्थितीत काँग्रेसच्या नजरा पूर्णपणे महात्मा जोतिबा फुले यांच्यावर खिळल्या आहेत. काँग्रेसचे पूर्ण लक्ष दलित मतदारांवर आहे.