Marathi News National Supreme Court's displeasure over announcements of 'free' schemes in election campaign, political parties' ears pricked, directives to central government too
Player death: मैदानात मॅचमध्ये कबड्डी प्लेयरचा मृत्यू, दुसऱ्या पार्टीच्या प्लेयरला हात लावून पळताना पडला, परत उठलाच नाही
विमलच्या मृतदेहासद ट्रॉफी ठेवून त्याचा मृतदेह दफन करण्यात आला आहे. त्याच्या वडिलांनी ट्रॉफीसह त्याचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त होते आहे.
मॅच खेळताना कबड्डी प्लेअरचा मृत्यूImage Credit source: social media
पनतुरी– एका कबड्डी प्लेयरचा (Kabbadi Player) मॅच खेळताना मृत्यू (Dead in match)झाल्याची घटना घडली आहे. रविवारी जिल्हा पातळीवर सुरु असलेल्या क्रीडा स्पर्धेत हा प्रकार झाला होता. मात्र हा प्रकार मंगळवारी समोर आला. तामिळनाडूच्या (Tamilnadu)पनतुरीजवळ मणदिकुप्पम गावात हा प्रकार घडला आहे. विमलराज असं या मृत झालेल्या कबदड्डी प्लेयरचं नाव आहे. जेव्हा मॅच सुरु होती तेव्हा विमलराजची रेड करण्याची वेळ आली. त्याने श्वास रोखून एन्ट्री केली. याच काळात विरुद्ध पार्टीच्या प्लेअर्सनी विमलला चारही बाजूंनी घेरले. त्यावेळी एका प्लेयरचा पाय खाली पडलेल्या विमलच्या छातीवर पडला. मात्र विमलने त्याचे दोन पाँइंट घेतलेच. त्यानंतर विमल उठू शकला नाही. त्याच्या साथीदारांनी त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
@annamalai_k anna vannakkam kabaddi player death ogalukgu theriumnu nenakguran ogalala mudicha help antha payan family pannuga naaaa pls pls pls pls … pic.twitter.com/LZzLAKc0xc
पोलिसांनी त्यानंतर विमलराजचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचे सांगण्यात येते आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची आता चौकशी सुरु करण्यात आली आहे. या घटनेनंतर त्या स्पर्धेच्या ठिकाणी शोककळा पसरली. त्याचे सहकारी प्लेअर्स आणि त्याच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. विमलचा कबड्डी खेळतानाचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
जिंकलेल्या ट्रॉफीसह मृतदेहाचे दफन
विमलच्या मृत्यूनंतर आणखी एक व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. ज्यात विमलच्या मृतदेहासद ट्रॉफी ठेवून त्याचा मृतदेह दफन करण्यात आला आहे. त्याच्या वडिलांनी ट्रॉफीसह त्याचा मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या प्रकाराबद्दल हळहळ व्यक्त होते आहे.