राहुल गांधींसोबत आता तरुण नेत्यांची फौज ! कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, मुहूर्तही ठरला

भारतीय कम्यूनिष्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कन्हैया यांचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाला असून शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी प्रक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

राहुल गांधींसोबत आता तरुण नेत्यांची फौज ! कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, मुहूर्तही ठरला
KANHAIYA KUMAR JIGNESH MEVANI
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 4:09 PM

नवी दिल्ली : भारतीय कम्यूनिष्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. कन्हैया यांचा काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित झाला असून शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी प्रक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. विद्यार्थी नेता अशी कन्हैया कुमार यांची ओळख आहे. तसेच कन्हैया यांच्यासोबत गुरजामधील आमदार जिग्नेश मेवाणीही (Jignesh Mevani) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दोघांनीही काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली होती. (kanhaiya kumar and jignesh mevani likely to join congress on bhagat singh birth anniversary)

राहुल गांधी यांच्या कन्हैया, मेवाणी यांच्यासोबत गुप्त बैठका

कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. ही बैठक शक्य तितकी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच काँग्रेसमधील बड्या नेत्यांनादेखील या भेटीची कल्पना नव्हती. खुद्द काँग्रेसचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष भक्त चरण दास यांनादेखील कन्हैया कुमार आणि राहुल गांधी यांच्यात झालेल्या भेटीची खबर नव्हती. तर दुसरीकडे गुजरातमध्ये आमदार जिग्नेश मेवानी यांच्या रुपात काँग्रेसला तरुण आणि तडफदार चेहरा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी मेवाणी यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीत काँग्रेस प्रेवशाबाबत चर्चा करण्यात आली होती. हे दोन्ही नेते आता येत्या 28 सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

कन्हैया यांच्या प्रवेशानंतर बिहारमध्ये काँग्रेसची शक्ती वाढणार ?

अनेक राज्यांत केंद्रीय तसेच राज्य पातळीवर काँग्रेस खिळखिळी झाली आहे. बिहारसारख्या राज्यात काँग्रेसचे फक्त 19 आमदार आहेत. येथे आरजेडीसारख्या इतर प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्ष मजूबत करण्याकडे लक्ष दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कन्हैयासारख्या तरुण नेत्याला पक्षात सामील करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कन्हैया कुमार तरुण आणि तडफदार आहेत. तसेच तरुण, विद्यार्थ्यांमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यांची भाषणं, मांडलेले मुद्दे चर्चेचा विषय ठरतात. त्यामुळे कन्हैया यांचा काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो, असा अदांज काँग्रेसमधील नेते बांधत आहेत. दरम्यान, कन्हैया कुमारने कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजप नेते गिरिराज सिंह यांनी त्यांना पराभूरत केलं होतं.

विधानसभेच्या 70 पैकी फक्त 19 जागांवर विजय

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कन्हैया कुमार यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. कन्हैया यांच्यामुळे बिहारमध्ये काँग्रेसची ताकद वाडढणार आहे. मागील निवडणुकीत आपल्या मित्रपक्षांच्या तुलनेत काँग्रेसचे प्रदर्शन अत्यंत खराब राहिलेले आहे. एकूण 70 जागांपैकी काँग्रेसला फक्त 19 जागांवर विजय मिळाला होता. तर मित्रपक्ष असलेल्या सीपीआय तसेच राजदने तुलनेने चांगली कामिगिरी केली होती. सीपीआयने 19 जागांपैकी 12 जागांवर आपले उमेदवार निवडणून आणण्याची किमया साधली होती. तर राजदने 144 पैकी अर्ध्या पेक्षा जास्त जागांवार विजय प्राप्त केला होता.

मेवाणींच्या काँग्रेस प्रवेशामुळे काय फायदा होणार ?

गुजरातमध्येही काँग्रेसची फारशी चांगली स्थिती नाही. गांधी घराण्याशी जवळचा संबंध असणारे अहमद पटेल यांचे निधन झाले आहे. त्यामुळे गुजरातचे राजकारण आणि केंद्रीय नेते यांच्यातील संपर्कदुवा कोण होणार याबाबत अनेक प्रश्नचिन्ह आहेत. तर दुसरीकडे पहिल्यांदाच निवडणूक लढवून आमदार होण्याची किमया जिग्नेश मेवाणी यांनी साधलेली आहे.  दलित तसेच दुबळ्यांचे प्रश्न मांडणारा तरुण नेता म्हणून जिग्नेश यांची ओळख आहे. गुजरातमध्ये जिग्नेश चांगलेच लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे गुजरातमध्ये काँग्रेसला चांगले दिवस येण्याची अपेक्षा आहे. कदाचित याच कारणामुळे जिग्नेश  यांना पक्षात सामावून घेण्यास काँग्रेस उत्सुक आहे.

दरम्यान या दोन्ही नेत्यांचा येत्या 28 सप्टेंबर रोजी काँग्रेस प्रवेश निश्चित असल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही तरुण आणि तडफदार नेत्यांच्या पक्षप्रवेशानंतर काँग्रेसला गुजरात, बिहार तसेच अन्य राज्यांत नवसंजिवनी मिळेल असा तर्क बांधला जात आहे.

इतर बातम्या :

आता छत्तीसगडमध्येही मुख्यमंत्री बदलाचे वारे; काँग्रेस नेते टीएस सिंहदेव म्हणाले, पंजाबमध्ये बदल होऊ शकतो तर…

National Cooperative Conference live : महाराष्ट्रातील 5 सहकार महर्षींना अमित शाहांचं जाहीर नमन

हॅरिस यांना आजोबांच्या आठवणी, मॉरिसन यांना समुद्री मैत्रीचं प्रतीक, तर जापानला बुद्धाचे विचार, वाचा अमेरिकेच्या दौऱ्यात मोदींनी कुणाला काय गिफ्ट दिलं!

(kanhaiya kumar and jignesh mevani likely to join congress on bhagat singh birth anniversary)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.