एमएमस कांड; मुलींनो सावधान; तुमचा कोणीतरी व्हिडीओ बनवतय…

चंदीगड, केरळ आणि आता कानपूरमध्ये मुलींच्या वसतिगृहामध्ये एमएमएस कांड घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

एमएमस कांड; मुलींनो सावधान; तुमचा कोणीतरी व्हिडीओ बनवतय...
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 3:44 PM

कानपूरः चंदीगडमधील एमएमएस कांड (MMS viral) घडल्यानंतर वसतिगृहामध्ये राहणाऱ्या अनेक मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील कानपूरमध्येही (Kanpur) वसतिगृहातील मुलींचे अश्लील व्हिडीओ (Video Viral) बनवल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सफाई कामगाराला अटक केली आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव ऋषी असून तो तिथेच काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या बरोबरच वसतिगृहातील महिला वॉर्डनलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी वसतिगृह संचालक मनोज पांडे यालाही अटक करण्यात आली असून या प्रकारामुळे वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना मानसिक धक्का बसला आहे.

हे प्रकरण उघड होताच, वसतिगृहात राहणाऱ्या 55 ​​विद्यार्थिनींनी वसतिगृह सोडले आहे. या वसतिगृहात राहणाऱ्या मुली या वैद्यकीय परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्या इथे थांबल्या होत्या.

एमएमस कांड झाल्याचे समजताच आणि विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून कानपूर पोलिसांनी वसतिगृहावर कडक बंदोबस्त ठेवला आहे.

पोलिसांनी वसतिगृहाची चौकशी करण्यास सुरुवात केल्यानंतर वसतिगृहाच्या गेटवर एका उत्तर प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्याचे नावंही तिथे आढळून आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या परिस्थितीत हे वसतिगृह त्यांचेच असल्याचे सांगण्यात येऊ लागले आहे.

या प्रकरणी कानपूर कल्याणपूरचे एसीपी दिनेश शुक्ला यांनी बुलंदशहरमध्ये एसपी म्हणून तैनात सुरेंद्र नाथ तिवारी यांच्याशी बोलून माहिती घेतली आहे. त्यानंतर त्या नावाशी आणि घराशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे.

मुलींच्या वसतिगृहातील ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी वसतिगृह चालकाला अटक केली आहे. एमएमएस प्रकरणी होस्टेलच्या वॉर्डनकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी कारवाई केली नसल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी वॉर्डनलाही अटक केली आहे.

कानपूर पोलीस ठाण्याच्या रावतपूर परिसरात असलेल्या या वसतिगृहातील मुलींनी वसतिगृहात येणाऱ्या सफाई कामगारावर संशय व्यक्त केला आहे. त्या कामगाराने त्यांच्या आंघोळीच्या वेळेचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने सफाई कामगार ऋषीला अटक केली असून मोबाईलमध्ये सापडलेले व्हिडीओ होस्टेलमधील आहेत की बाहेरचे आहेत त्याची चौकशी केली जात आहे.

सफाई कामगार वसतिगृहावर काम करण्यासाठी गेल्या किती दिवसांपासून येत आहे. त्याची चौकशी सुरु असून संबंधित व्यक्तीनाही ताब्यात घेऊन चौकशी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हे प्रकरण संवेदनशील असूनल्या सह पोलीस आयुक्त आनंद प्रकाश तिवारी या घटनेच्या मुळाशी जाऊ या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.