Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karnataka Election Result: कर्नाटकातील आमदारांचा एकच सूर; खर्गे यांनी CM पदाचा निर्णय घ्यावा…

15 मे र त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 15 मे 1962 रोजी झाला आहे, त्यामुळे त्यांचा उद्या आता 61 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Karnataka Election Result: कर्नाटकातील आमदारांचा एकच सूर; खर्गे यांनी CM पदाचा निर्णय घ्यावा...
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 12:42 AM

बेंगळुरू: कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत अजूनही सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी बेंगळुरूमध्ये पद मिळण्याआधीच जोरदार घोषणाबाजी केली आहे. तर बंगळुरू येथे रात्री 8 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठकही पार पडली आहे. त्यामुळे या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाचीही घोषणा होऊ शकते अशी शक्यताही वर्तवली जात होती, मात्र तसे काही झाले नाही. काँग्रेस विधिमंडळ पक्षाने रविवारी एक संक्षिप्त ठराव पास केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे कर्नाटकातील विधिमंडळ पक्षाचे पुढचे नेते ठरवणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर एका ओळीच्या ठरावात असंही सांगण्यात आले आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाने एकमताने ठराव केला,

की काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नवीन नेत्याची नियुक्ती करण्यासाठी काँग्रेसची समिती अधिकृतपणे घोषणा करणार आहे. तरीही सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार उद्या दिल्लीला भेट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेसने कर्नाटकसाठी सुशीलकुमार शिंदे, दीपक बावरिया आणि जितेंद्र सिंह यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू होण्यापूर्वी सिद्धरामय्या, डीके शिवकुमार आणि रणदीप सुरजेवाला यांची स्वतंत्र बैठक झाली होती.

त्यामध्ये प्रत्येक आमदाराचे मत घेण्याच्या सूचना खर्गे यांनी पर्यवेक्षकांना दिल्याचेही सुरजेवाला यांनी सांगितले. आमदारांचा अभिप्राय घेण्याची प्रक्रिया आज रात्रीच पूर्ण होणार असून आमदारांचे मत पक्षाध्यक्षांना सादर करून त्यानंतर अध्यक्षांकडून तो निर्णय देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कर्नाटकातील निवडणूक निकालानंतर सिद्धरामय्या यांच्या समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर अनेक पोस्टर्स लावून जल्लोष केला होता. तर या पोस्टर्समध्ये सिद्धरामय्या हेच कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे.

त्याचवेळी डीके शिवकुमार यांच्या घराबाहेरही असे पोस्टर लावण्यात आले असून, त्यात त्यांनाही भावी मुख्यमंत्री म्हणत त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही त्यांना देण्यात आल्या आहेत.

15 मे र त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 15 मे 1962 रोजी झाला आहे, त्यामुळे त्यांचा उद्या आता 61 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

कर्नाटकातील काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी सांगितले की, मी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दिलेले वचन मी पूर्ण केले आहे.

त्यामुळे मी आता कर्नाटकातील लोकांकडून त्यांचे आशीर्वाद मागतो आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचे जाहीर आभारही मानतो असंही त्यांनी सांगितले.

लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून मतदान केले आहे. तर दुसरीकडे सोनिया गांधी मला भेटायला तुरुंगात आल्या होत्या हे मी कधीही विसरू शकत नाही, कारण त्यांनी दाखवलेला विश्वास, मी गांधी परिवार आणि सिद्धरामय्या यांच्यासह सर्व पक्षाच्या नेत्यांचे आभार मानत त्यांनी भावूकपणे त्यांचे आभार मानले आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.