Hijab नंतर कर्नाटकात नवा वाद, मंदिराच्या ठिकाणी मुस्लिमांच्या स्टॉलवर बंदी? काय आहे प्रकरण?
कर्नाटकात येत्या महिन्यात दोन ठिकाणी महोत्सव आहेत. पुत्तूर तालुक्यातील महालिंगेश्वर मंदिरात 20 एप्रिलपासून वार्षिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. येथील स्टॉलचा लीलाव सुरु आहे. यात मुस्लिमांनी सहभाग घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
बंगळुरू | कर्नाटकात (Karnataka) शाळा- महाविद्यालयांमध्ये हिजाब (Hijab) घालण्यावर बंदी घालण्यावरून पेटलेला वाद काही प्रमाणात शमतोय, तोच नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या एप्रिल महिन्यात दक्षिण कन्नड जिल्ह्यात दुर्गा देवीचा भव्य वार्षिक उत्सव आहे. या उत्सव काळात मंदिराच्या आवारात कोणत्याही मुस्लिम बांधवांनी स्टॉल लावू नये, असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. तसेच पुत्तूर तालुक्यातील महालिंगेश्वर मंदिरातदेखील 20 एप्रिलपासून एक यात्रा (Festival in Temple) भरणार आहे. येथेही स्टॉल्सच्या लीलावाची प्रक्रिया सुरु झाली असून त्यात मुस्लिमांनी सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ हिंदूंनीच स्टॉलसाठी बोली लावावी, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कर्नाटकात येत्या काही दिवसात या मुद्द्यावरूनदेखील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
का केली जातेय मागणी?
कर्नाटकमधील स्थानिकांच्या मते, उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी अशा प्रकारची मागणी केली आहे. त्यामुळे बहुतांश मंदिरांच्या समित्यांवर दबाव टाकला जात आहे. हिजाबवर कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर अनेक मुस्लिम संघटनांनी बंद पुकारला. त्यांनी दुकाने बंद ठेवली. या त्यांच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्यासाठी येत्या काही दिवसात जे वार्षिक महोत्सव होत आहेत, तेथे त्यांना स्टॉल लावण्यास परवानगी देण्यात येऊ नये, अशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे काही मंदिर समित्यांनी यावर अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
बॅनरवर काय लिहिलंय?
कर्नाटकात येत्या महिन्यात दोन ठिकाणी महोत्सव आहेत. पुत्तूर तालुक्यातील महालिंगेश्वर मंदिरात 20 एप्रिलपासून वार्षिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. येथील स्टॉलचा लीलाव सुरु आहे. यात मुस्लिमांनी सहभाग घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ हिंदुंनीच स्टॉलवर बोली लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बप्पनडुई येथल श्री दुर्गापमेश्वरी मंदिरात वार्षिक उत्सावासाठीही तयारी सुरु आहे. तेथेही असेच पोस्टर लावण्यात आले आहे. पोस्टरमध्ये लिहिलंय की, ज्यांना कायद्याचा आदर करायचा नाही, जे एकतेच्या विरोधात आहेत, आम्ही ज्यांची पूजा करतो, त्या गायींना जे मारतात, त्यांना येथे व्यवसाय करण्याची परवानगी नाही. आता हिंदू जागरूक झाले आहेत.
बॅनर लावणाऱ्याचा शोध सुरु
दरम्यान, बंगळुरू शहरातील पोलीस आयुक्त शशी कुमार यांनी सांगितले की, हे बॅनर कुणी लावले याचा शोध घेतला जात आहे. तेथील तहसीलदारांना सदर घटनास्थळाचा दौरा करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांनीदेखील या प्रकाराबद्दल निषेध व्यक्त केला आहे.
इतर बातम्या-