‘डीके, मुझे आप पर भरोसा’ ; शिवकुमार यांना आठवले सोनिया गांधी यांचे शब्द…

काँग्रेस विधिमंडळ पक्षाने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे मुख्यमंत्री निवडीची जबाबदारी सोपवली आहे. तर काँग्रेसने सुशील शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया या तीन निरीक्षकांना कर्नाटकात पाठवले होत, त्यांनी आमदारांशी चर्चा करून दिल्लीत आल्यानंतर अहवाल हायकमांडला सुपूर्द केला असल्याची चर्चा आहे.

‘डीके, मुझे आप पर भरोसा’  ; शिवकुमार यांना आठवले सोनिया गांधी यांचे शब्द...
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 12:13 AM

बेंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरुन चाललेला वाद अजूनही सुरुच आहे.कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी.के शिवकुमार यांनी सोमवारी दिल्लीत येण्यास नकार दिल्यानंतर कर्नाटकातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी तब्बेतीचे कारण देत त्यांनी दिल्लीचा दौरा रद्द केला.डी. के शिवकुमार मंगळवारी दिल्लीला जाऊ शकतात अशी शक्यताही वर्तवली जात आहे. काँग्रेसने कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर अद्याप निर्णय घेतलेला नाही, तरीही सिद्धरामय्या यांनी राजधानी दिल्लीत तळ ठोकला आहे. पक्ष सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकतो अशी शक्यता दुसरीकडे वर्तवली जात आहे.

एका वृत्त वाहिनीशी बोलताना डीके शिवकुमार यांनी सांगितले की, बंगळुरूमध्ये त्यांची काही कामं आहेत. तसेत त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांच्या वैद्यकीय तपासण्या करायच्या आहेत.

हे सर्व पूर्ण करून ते दिल्लीला रवाना होतील असंही सांगण्यात आले आहे. ज्यांच्यामुळे या निवडणुकीत विजयाचा जो आकडा मिळवून दिला आहे त्यांच्याबरोबर आपण सौजन्य दाखवायला हवे असं मत शिवकुमार यांनी व्यक्त केले. त्यामुळे त्यानंतर मी दिल्लीला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले.

दिल्लीला जाण्याचा प्लॅन अचानक रद्द करणे ही बंडखोर वृत्ती मानली जात असली तरी त्यावर डीके म्हणतात की मी असे का करेन? मी ना बंड करतो ना ब्लॅकमेल करतो.

ही संस्कृती नाही असंही त्यांनी यावेली सांगितली. सोनिया गांधी यांनी प्रदेशाध्यक्षपदाची कमान डीके शिवकुमार यांच्यावर सोपवली होती.सोनिया गांधी यांनी त्यांना सांगितले होते की, ‘डीके, मला तुमच्यावर विश्वास आहे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी हे कामा केले असंही त्यांनी यावेळी सांगतिले.

सोनिया गांधींनी अनेक अडचणींना तोंड देत माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला आहे.तर काही ज्येष्ठ नेत्यांनी पाठिंबाही दर्शवला होता. आज अहमद पटेल नसले तरी त्यांनीही माझ्यावर टाकलेला विश्वास मी विसरू शकत नाही असंही त्यांनी भावून होत सांगितले.

एकीकडे शिवकुमार यांच्याबद्दल जोरदार चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे सिद्धरामय्या यांनी दावा केला आहे की त्यांना डीके शिवकुमार यांच्यापेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे.

ज्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात की त्यांना अशा कोणत्याही गुप्त मतदानाची माहिती नाही आणि त्यांना फक्त सिद्धरामय्या यांना शुभेच्छा द्याव्या लागल्या आहेत.

काँग्रेस विधिमंडळ पक्षाने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे मुख्यमंत्री निवडीची जबाबदारी सोपवली आहे. तर काँग्रेसने सुशील शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया या तीन निरीक्षकांना कर्नाटकात पाठवले होत, त्यांनी आमदारांशी चर्चा करून दिल्लीत आल्यानंतर अहवाल हायकमांडला सुपूर्द केला असल्याची चर्चा आहे.

Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.