Karnataka Election Result : सिद्धरामय्या की शिवकुमार; कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री ?
कर्नाटकात कोणाचे राज्य येणार हे आज स्पष्ट होणारच आहे. जर कॉंग्रेसला बहुमत मिळाले तर कॉंग्रेसचे सर्वात मोठे नेते म्हणून सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता अधिक आहे. परंतू डी.के. शिवकुमार देखील स्पर्धेत आहेत.
मुंबई : देशभरात कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक निकालांची चर्चा सुरू आहे. कॉंग्रेसच्या कार्यालयात उत्साहाचे वातावरण आहे. असा कल कायम राहीला तर कॉंग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. अशात आता कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. राज्यात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. कर्नाटकात 10 मे रोजी विधान सभेच्या 224 जागांसाठी मतदान झाले. या निवडणूकात कॉंग्रेस , भाजप आणि जेडीएसमध्ये मोठी टक्कर होती. सुरुवातीच्या निकालांच्या सुरूवातीच्या कलानुसार कॉंग्रेसचे सरकार बनण्याची शक्यता आहे. आता जर कॉंग्रेसचे सरकार बनले तर मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार हे दोघेही आहेत.
‘आऊटलूक’ला दिलेल्या मुलाखतीत सिद्धरामय्या यांना विचारले की मुख्यमंत्री पदावरून तुमच्यात आणि डी.के. शिवकुमार यांच्यात काही बेबनाव तर नाही ना ? यावर त्यांनी कॉंग्रेसने अजूनपर्यंत आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. हा शिवकुमार एक दावेदार जरूर आहेत. कॉंग्रेसमध्ये निकालापूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची रित नाही. खासकरून कर्नाटकात तरी कॉंग्रेसने पत्ते बाहेर काढलेली नाहीत. त्यांच्याकडे जर पार्टी बहुमताचे आकडे प्राप्त केले आणि सत्ता येणार असेल तर निवडणू आलेले आमदार आपला नेता ठरवतील मग त्यावर पक्षश्रेष्टी आपला निकाल देतील.
सोनिया गांधी यांची मर्जी राखणारे
परंतू पक्षाच्या कार्यकर्ते म्हणतात त्याप्रमाणे जर सरकार आले तर मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात संघर्ष होणार आहे. सिद्धरामय्या हे जास्त अनुभवी आणि ज्येष्ठतेमध्ये पुढे आहेत. त्यांच्याकडे सरकार चालविण्याचा अनुभव आहे. तर डी.के. शिवकुमार आव्हान स्वीकारणारे नेतृत्व असून सोनिया गांधी यांची मर्जी राखणारे नेते असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अखेर अंतिम निर्णय तर दिल्लीतूनच होणार आहे.
पक्षाची पहीली पसंती
कर्नाटकात कोणाचे राज्य येणार हे आज स्पष्ट होणारच आहे. जर कॉंग्रेसला बहुमत मिळाले तर कॉंग्रेसचे सर्वात मोठे नेते म्हणून सिद्धरामय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडण्याची शक्यता अधिक आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या साल 2013 पासून साल 2018 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री पदी राहीलेले आहेत. 13 मेला जर निवडणूक निकालात कॉंग्रेसला जर 113 जागा मिळाल्या तर बहुमत मिळाले तर सिद्धरामय्या पक्षाची पहीली पसंती ठरतील. सिद्धरामय्या यांनी सामाजिक आणि आर्थिक सुधारणांवर भर दिला आहे.
सलग आठ वेळा निवडणून आले
डी.के.शिवकुमार यांनी 12 मे रोजी एक ट्वीट केले होते. त्यात त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपण शर्यतीत असल्याचे स्पष्ट केले होते. कर्नाटक विधानसभा निवडणूकांच्या निकालाच्या एक दिवस आधी त्यांनी कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष रुपात आपल्या तीन वर्षांचा कार्यकालाचा व्हिडीओ ट्रेलर जारी केला होता. शिवकुमार कनकपुरा येथून विधानसभेवर सलग आठ वेळा निवडणून आले आहेत. शिवकुमार यांचा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न खुप वर्षांपासूनचे आहे. साल 2018 च्या निवडणूकातही त्यांचे स्वप्न भंगले.