भरधाव BMW डिव्हायडर पार करत विरुद्ध दिशेला! डिव्हायडरवर उभ्या असलेल्या महिलेचं काय झालं? पाहा थरारक Video
BMW Accident CCTV Video : मंगळुरुमध्ये झालेल्या या अपघातामध्ये एका बीएमडब्लू कारनं डिव्हायडर पार केला. भरधाव कर डिव्हाडर ओलांडून थेट विरुद्ध दिशेला घुसली. यावेळी विरुद्ध दिशेला असलेल्या कार आणि दुचाकींला या सुसाट बीएमडब्लू कारनं जोरदार ठोकर दिली.
राज्यात एकीकडे अपघातांचं (Road Accident) सत्र सुरु आहे. दररोज रस्ते अपघातातील बळींची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. अशातच आता अपघाताचं एक थरारक सीसीटीव्ही समोर आलं आहे. किरण पराशर या ट्वीटर अकाऊंटवरुन या अपघाताचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ शेअर (Shocking Video of Accident CCTV) करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एका भरधाव कारनं महिलेसह दुचाकीस्वाराला धडक दिली. भरधाव कारनं डिव्हायडर तोडून उलट्या दिशेला जात, समोर उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार ठोकर दिली. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) अपघाताचा हा थरार कैद झाला आहे. दुचाकीस्वारांना धडक दिल्यानंतर एक महिलाही रस्त्यावर कोसळली. मात्र दैव बलवत्तर म्हणून या महिलेचा थोडक्यात जीव वाचला आहे. अवघ्या 10 सेंकदांच्या या व्हिडीओमध्ये तीन सेकंदात विचलीत करणारी थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
कुठे घडला अपघात?
हा अपघात घडला कर्नाटकच्या मंगळुरु शहरामध्ये. 9 एप्रिल रोजी अपघाताचा हा सीसीटीव्ही व्हिडीओ ट्वीटरवर अपलोड करण्यात आला आहे. किरण पराशर यांनी ही घटना ट्वीटरवरुन शेअर केली आहे.
किरण पराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळुरुमध्ये झालेल्या या अपघातामध्ये एका बीएमडब्लू कारनं डिव्हायडर पार केला. भरधाव कर डिव्हाडर ओलांडून थेट विरुद्ध दिशेला घुसली. यावेळी विरुद्ध दिशेला असलेल्या कार आणि दुचाकींला या सुसाट बीएमडब्लू कारनं जोरदार ठोकर दिली.
महिला थोडक्यात बचावली
यावेळी एक महिला अपघातातून बालंबाल बचवाली आहे. ज्यावेळी बीएमडब्लू कार डिव्हायडर पार करुन विरुद्ध दिशेला घुसली, नेमक्या त्याच वेळी एक महिला डिव्हायडरवर उभी होती. मात्र ही महिला आश्चर्यकारकरीत्या बचावली आहे. या महिलेला भरधाव कारनं धडकही दिली. ही महिला थेट रस्त्यावर कोसळली. मात्र या महिलेचा जीव थोडक्यात वाचला.
मात्र विरुद्ध दिशेला असलेल्या दुचाकींना मात्र जबर फटका बसला. दोघा दुचाकीस्वारांना या अपघातात गंभीर जखम झाली आहे. तर बीएमडब्लूसह आणखी एका कारचंही या अपघातात दुकान झालं आहे. तसंच दोन दुचाक्यांचंही नुकसान झालं आहे. डिव्हाडर पार केल्यानंतर पहिलाच धडक ही दुचाकीवर बसल्यानं त्यांना जबर मार लागला आहे.
रस्ते अपघातांची वाढती चिंता!
शनिवारी मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायेववर भरधाव कारच्या अपघातात चार तरुणांचा जीव गेला होता. वर्ध्यातली एका वऱ्हाडींची गाडी उलटून दोघे दगावले होते. राज्यातील अपघातांच्या वाढत्या घटनांची चिंता सतावत आहे. असं असतानाच आता या थरारक सीसीटीव्ही व्हिडीओमुळे वाहन चालकांच्या वेगावर नियंत्रण कसं आणायचं, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
पाहा व्हिडीओ –
#Karnataka A 2 wheeler rider critically injured after a BMW car jumped over a divider and crashed into another car and two wheeler in #Mangaluru @IndianExpress pic.twitter.com/tuTouAg6FP
— Kiran Parashar (@KiranParashar21) April 9, 2022
संबंधित बातम्या :
टेबलाला धक्का लागला म्हणून तरुणाची हत्या! 8 ते 10 जणांकडून जाईपर्यंत मारहाण
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचे थोरले बंधू ब्रम्हानंद पडळकरांच्या गाडीला अपघात
Kalyan Murder : आधी महिलेची हत्या केली, मग थेट आधारवाडी जेलमध्ये पोहचला; पोलिसही चक्रावले !