AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्ञानवापीचा ऐतिहासिक निर्णय देणारे न्यायधीश निवृत्त, शेवटच्या दिवशी ऐतिहासिक आदेश

Varanasi court order | वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर काशीमधील ज्ञानवापीचे तळघर तब्बल 31 वर्षानंतर मध्यरात्री उघडले. नोव्हेंबर 1993 नंतर या ठिकाणी पूजा झाली. वाराणसी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांनी हा निर्णय दिला होता. त्यानंतर ते निवृत्त झाले.

ज्ञानवापीचा ऐतिहासिक निर्णय देणारे न्यायधीश निवृत्त, शेवटच्या दिवशी ऐतिहासिक आदेश
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 2:12 PM

नवी दिल्ली, दि.1 फेब्रुवारी 2024 | काशीमधील ज्ञानवापीचे तळघर तब्बल 31 वर्षानंतर मध्यरात्री न्यायालयाच्या आदेशानंतर उघडले. तळघरात पूजा करण्यात आली. आरतीसुद्धा झाली. वाराणसी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार विश्वेश यांनी हा निर्णय दिला होता. त्यानीच भारतीय पुरातत्व विभागाला सर्वे करण्याचे आदेश दिले होते. सर्वेनंतर त्या ठिकाणी हिंदू मंदिराचे पुरावे मिळाले. यामुळे न्या. विश्वेस यांनी पूजा सुरु करण्याचे आदेश दिले. आदेश काढल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 जानेवारी रोजी ते सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांच्या या निकालामुळे त्याचे नाव ऐतिहासिक निकाल देणाऱ्या न्यायाधिशांमध्ये पोहचले आहे. आता इतिहासात त्यांच्या या निर्णयाचे उदाहरण कायमस्वरुपी राहणार आहे.

9 तासांत बॅरीकेड काढले

वाराणसी जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश होण्यापूर्वी डॉ. अजय कृष्ण विश्वेश विविध पदांवर काम केले. ज्ञानवापी खटल्याची सुनावणी त्यांच्यापुढे सुरु होताच ते चर्चेत आले. जिल्हा न्यायाधीश म्हणून वाराणसी न्यायालयात ते 21 ऑगस्ट 2021 रोजी आले होते. त्यांनी ज्ञानवापी प्रकरणाचा निकाल दिल्यावर 9 तासांत बॅरीकेड काढण्यात आले. रात्री पूजाही करण्यात आली.

पुजारी काय म्हणाले…

पुजारी माधव दत्त त्रिपाठी यांनी म्हटले की, आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. न्यायालयाचा हा निर्णय सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. आधी आम्हाला जाऊ देत नव्हते. आता मी या ठिकाणी पूजाअर्चा करणार आहे. धूप-दीप प्रज्वलित होईल. आरती होईल. मूर्तीचे सृजन होईल. जी बाबा विश्वनाथ यांच्या पूजेची प्रक्रिया तिच प्रक्रिया व्यास तळघरात होणार आहे.

हे सुद्धा वाचा

मध्यरात्रीच झाली पूजा

न्यायालयाच्या आदेशानंतर काशीमधील ज्ञानवापीचे तळघर तब्बल 31 वर्षानंतर मध्यरात्री उघडले. रात्री पूजन आणि आरती करण्यात आली. यापूर्वी नोव्हेंबर 1993 पर्यंत या ठिकाणी पूजा केली जात होती. परंतु तत्कालीन मुलायमसिंह यादव सरकारनेराज्य सरकारने ही पूजा थांबली. आता ती पुन्हा सुरु झाल्यामुळे हिंदू पक्षाकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा

मध्यरात्री ज्ञानवापीचे तळघर उघडले, 31 वर्षानंतर पूजा, गणेश-लक्ष्मीची आरती

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.