Hindu Bank Manager Murder CCTV : दहशतवाद्यांनी बँकेत घुसून गोळ्या घातल्या, काश्मिरातल्या हिंदू बँक मॅनजरच्या हत्येचे CCTV

या भ्याड हल्ल्यात बँक मॅनेजर विजय कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेले विजय कुमार यांचा काही दिवस पाठलाग केल्यानंतर दहशतवाद्यांनी हे धाडस केलं आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

Hindu Bank Manager Murder CCTV : दहशतवाद्यांनी बँकेत घुसून गोळ्या घातल्या, काश्मिरातल्या हिंदू बँक मॅनजरच्या हत्येचे CCTV
दहशतवाद्यांनी बँकेत घुसून गोळ्या घातल्या, काश्मिरातल्या हिंदू बँक मॅनजरच्या हत्येचे CCTVImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 3:44 PM

श्रीनगर : काश्मीरमधील (Jammu Kashmir)कुलगाममध्ये आणखी एक हत्या दिवसाढवळ्या करण्यात (Jammu Kashmir Hindu Murder) आली आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल भट्टची झालेली हत्या ताजी होती. त्यातच ही घटना घडल्याने पुन्हा खळबळ माजली आहे. बंदुकीच्या गोळ्या घालून दहशतवाद्यांनी (Terrorist) आणखी एका निष्पापाचा जीव घेतला. दहशतवाद्यांच्या या रक्तरंजित कारस्थानाचा नवा बळी विजय कुमार ठरले. आज सकाळी कुलगाममधील बँक कर्मचारी विजय कुमार बँकेत पोहोचले तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे काश्मीरच्या अपार सौदर्याला पुन्हा रक्त लागताना दिसत आहे. या भ्याड हल्ल्यात बँक मॅनेजर विजय कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. मूळचे राजस्थानचे रहिवासी असलेले विजय कुमार यांचा काही दिवस पाठलाग केल्यानंतर दहशतवाद्यांनी हे धाडस केलं आहे. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

हत्येचे सीसीटीव्ही फुटेज

सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमकं काय?

सीसीटीव्हीचं हे फुटेज टार्गेट किलिंगच्या घटनेची भयनकता दाखवतं. हा व्हिडिओ कुलगाममधील बँकेतील आहे. एक व्यक्ती बॅग घेऊन बँकेत शिरली. आत जाण्यापूर्वी तो एकदा मागे वळून पाहतो, आत आल्यावर तो एकदा डावीकडे आणि उजवीकडे पाहतो, त्यानंतर तो समोरच्या केबिनमध्ये बसलेल्या मॅनेजरवर पिस्तुलाने गोळीबार करतो. आणि या भयानक घटनेत एका निष्पाप बँक मॅनेजरचा जीव जातो. या घटनेने काश्मिरात पुन्हा दहशतीचे वातावरण पसरले आहे. अचानक झालेल्या या हल्ल्याने काही काळ तर सर्वांना सुन्न केलं मात्र काही वेळातच विजय कुमार यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कोण होते विजय कुमार?

विजय कुमार हे राजस्थानमधील हनुमानगढचे रहिवासी होते, ते कुलगामच्या मोहनपुरा येथे बँक मॅनेजरच्या पदावर होते, दहशतवाद्यांनी त्यांना बँकेच्या आतच गोळ्या घातल्या. दोन दिवसांत ही दुसरी हत्या आहे. मंगळवारी शाळेतील शिक्षिका रजनीबाला यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आणि आज सकाळी बँक मॅनेजर विजय कुमार यांना टार्गेट करण्यात आले. राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडित आधीच संतप्त आहेत आणि काश्मीरमधील मुस्लिम सोडून इतरांना टार्गेट केल्यामुळे लोकांनी आंदोलनं सुरू केली आहेत. अशातच आज विजय कुमार यांच्या हत्येनंतर त्यांचा राग अनावर झाला आहे. काश्मीरमध्ये वाढत्या टार्गेट किलिंगच्या घटना पाहता सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत सरन्यायाधीश एनव्ही रामण्णा यांना काश्मीरमधील हिंदूंच्या मृत्यूची सरकारला दखल घेण्यास सांगितले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.