AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kerala Lottery Winner: छप्पर फाड के! केरळमधल्या ऑटो ड्रायव्हरला लॉटरी लागली, रात्रीतून करोडपती, वाचा सविस्तर

12 कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या रिक्षा चालकाचं नाव जयपालन पी आर (Jayapalan P R) आहे. त्याने फॅन्सी लॉटरी तिकीटाद्वारे इतकी मोठी रक्कम आपल्या नावावर केली आहे.

Kerala Lottery Winner: छप्पर फाड के! केरळमधल्या ऑटो ड्रायव्हरला लॉटरी लागली, रात्रीतून करोडपती, वाचा सविस्तर
केरळमध्ये जयपालन पी आर या रिक्षा चालकाला 12 कोटींची लॉटरी लागली
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 6:02 PM

Kerala Lottery Winner: केरळच्या एका रिक्षा चालकाला लॉटरी (Lottery) लागली आहे. त्याने (Autodriver) तब्बल 12 कोटींची बंपर लॉटरी जिंकली आहे. ओणम बंपर लॉटरीचा (Onam Bumper Lottery) रिझल्ट आल्याच्या एक दिवसांनंतर विजेता एक रिक्षा चालक (Lottery Winner) असल्याचं उघडकीस आलं आहे. लॉटरी लागल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. ( Kerala rickshaw driver wins Rs 12 crore lottery Jaipalan PR Onam Bumper Lottery )

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या रिक्षा चालकाचं नाव जयपालन पी आर (Jayapalan P R) आहे. त्याने फॅन्सी लॉटरी तिकीटाद्वारे इतकी मोठी रक्कम आपल्या नावावर केली आहे. जयपालन हा कोच्चीपासून जवळच असणाऱ्या मराडूचा रहिवासी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओणमच्या दुसऱ्या दिवशी लॉटरीचा रिझल्ट आला. ज्यात जयपालनला लॉटरी लागली. रविवारी घोषित झालेल्या विजेत्या उमेदवाराच्या लॉटरीचा नंबर TE 655465 आहे. लॉटरी जिंकल्यानंतर जयपालनने माध्यमांन ा सांगितलं की, ‘मी 10 सप्टेंबरला त्रिपुनितुरा (Tripunithura) इथून लॉटरीचं तिकीट विकत घेतलं होतं. मला कळालं की हा फॅन्सी नंबर (Fancy Number) आहे.’

टॅक्स दिल्यानंतर जयपालनला 7 कोटी मिळणार

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक जयपालनला 12 कोटींची लॉटरी लागली आहे, त्यातील टॅक्सची रक्कम सरकारी खात्यात जमा झाल्यानंतर त्याच्या हातात 7 कोटी रुपये येतील. केरळ लॉटरीचा थिरुवोनम बंपर लॉटरी ड्रॉ हा रविवारी तिरुवनंतपुरमच्या गोर्की भवन इथं झाला. केरळ लॉटरी संचलनालयाच्या माहितीनुसार, राज्याचे अर्थमंत्री केएन बालगोपाल यांनी लॉटरीचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे परिवहन मंत्री एंटनी राजू होते. यावेळी राज्यात विकल्या गेलेल्या 54 लाख तिकीटांसाठी ओणम बंपर लॉटरीचा रिझल्ट घोषित करण्यात आला.

एवढ्या पैशाचं काय करणार?

तब्बल 7 कोटी रुपये आता जयपालन यांना मिळणार आहेत,  या पैशाचं काय करणार असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले की, माझ्यावर आणि कुटुंबावर काही कर्ज आहे, ते कर्ज फेडावं लागेल. कोर्टात एक खटला सुरु आहे, त्याचे पैसे भरावे लागतील. बहिणींना काही पैसे द्यावे लागतील. जयपालनची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब झाली होती, त्यातच त्याला घरही विकावं लागलं होतं. आता ही लॉटरी लागल्यानंतर आता दिलासा मिळाल्याचं जयपालन म्हणाले.

हेही वाचा:

Video | महिला किचनमध्ये काम करण्यात मग्न, अचानक केसांनी घेतला पेट, थरारक व्हिडीओ व्हायरल

ज्यांना आलिया भट्टच्या ही जाहिरातीत चुकीची वाटेल, त्यांना आयुष्यात काहीच चांगले दिसू शकत नाही!

 

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.