हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानचे झेंडे, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

आज सकाळी हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानचे झेंडे लावल्याचे आढळून आले होते. आता या प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर खलिस्तानचे झेंडे, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 3:56 PM

धर्मशाला : आज सकाळी हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विधानसभेच्या गेटवर आणि सुरक्षा भिंतींवर खलिस्तानचे झेंडे (Flags of Khalistan) लावण्यात आल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणी आता हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jayaram Thakur) यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत बोलताना मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले की, आज सकाळी विधानसभेच्या गेटवर आणि सुरक्षा भिंतींवर खलिस्तानचे झेंडे लावण्यात आल्याचे आढळून आले आहेत. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून, जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हरियाणा आणि पंजाब या शेजारील राज्यांच्या सीमावर्ती भागांच्या सुरक्षेचा देखील आढावा घेण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेश हे पर्यटकांच्या आकर्षनाचे केंद्र आहे. दर दिवशी मोठ्या संख्येने पर्यटक राज्याला भेट देण्यासाठी येत असतात त्यातीलच काही पर्यटकांनी हा खोडसाळपणा केला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून हे झेंडे हटवण्यात आले आहेत.

गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आला होता इशारा

दरम्यान सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशमध्ये अशी काही घटना घडू शकते याबाबतचा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून 26 एप्रिल रोजीच देण्यात आला होता. शीख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरुपतवंत सिंग पन्नू यांनी याबाबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना एक पत्र लिहिल्याची देखील माहिती समोर येत आहे. या पत्रात शिमल्यामध्ये खलिस्तानचा झेंडा फडकला जाऊ शकतो असे म्हटले होते. त्यानंतर आज सकाळी हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर आणि सुरक्षा भिंतींवर खलिस्तानचे झेंडे लावण्यात आल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

सुरक्षा व्यवस्थेत वाढ

याबाबत बोलताना कांगडाचे पोलीस प्रमुख खुशाल शर्मा यांनी सांगितले की, आम्हाला आज सकाळी हिमाचल प्रदेश विधानसभेच्या गेटवर आणि सुरक्षा भिंतीवर खलिस्तानचे झेंडे लावल्याचे आढळून आले. पर्यटकांपैकीच कोणतरी हा खोडसाळपणा केला असावा, आम्ही ते सर्व झेंडे हटवले आहेत. तसेच या प्रकरणात गुन्हा देखील दाखल करणार आहोत. मुख्यमंत्र्यांकडून या प्रकरणात तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.