Khargone Bus Accident : मौत का पुल.. 50 फूट उंच पुलावरून बस कोसळली, 25 प्रवासी दगावले; आरटीओ अधिकारी सस्पेंड
मध्यप्रदेशातील खरगोन येथे काल प्रचंड मोठा अपघात झाला. या अपघातात 24 प्रवाशी जागीच ठार झाले आहेत. तर 43 प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी आरटीओ अधिकारी निलंबित करण्यात आला आहे.
खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात काल मोठा बस अपघात झाला. या अपघातात 50 फूट उंचावरील पुलावरून बस नदीत कोसळली. या अपघातात 24 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 43 प्रवासी गंभीर जखमी आहे. ही नदी सुकलेली होती. त्यामुळे इतर प्रवासी वाचले. नाही तर मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान, या अपघाताची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी खरगोनचे पालक मंत्री कमल पटेल यांनी खरगोन आरटीओ अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. तसेच बसचा मालक, ड्रायव्हर आणि कंडक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातातील 43 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ते रुग्णालयात जीवन मृत्यूशी संघर्ष करत आहेत. हा अपघात झाल्यानंतर आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. तसेच या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. खरगोनच्या आरटीओ अधिकाऱ्यालाही सस्पेंड करण्यात आलं आहे.
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी
ही घटना अतिशय हृदयद्रावक आहे. जखमींशी विचारपूस केल्यानंतर बसमध्ये 67 प्रवासी प्रवास करत असल्याचं समजलं. बसची केवळ 35 प्रवासी नेण्याची क्षमता आहे. असं असताना 67 प्रवासी बसमध्ये कोंबण्यात आले. ड्रायव्हरसह हा आरटीओ अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा आहे. त्यामुळे आरटीओ अधिकाऱ्याला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आलं आहे, असं मंत्री कमल पटेल यांनी सांगितलं.
हेलिकॉप्टरने मदत करा
या घटनेवर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी अपघात स्थळी हेलिकॉप्टरने मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जखमींवर उपचार करा आणि दोषींवर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. या घटनेमुळे सरकारने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 35 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असताना 70-70 प्रवासी घेऊनच कसे जात होते? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे. अधिकारी काय करत होते. हा अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आहे. यातील सर्व दोषींवर कारवाई केली जाईल. प्राथमिकदृष्ट्या या अपघाताला आरटीओ जबाबदार आहे, असं सांगतानाच जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक सहाय्य केलं जाणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं.
अपघातातील मृतांची नावे
1. विवेक प्रेमचंद पाटीदार (23) 2. सोम दिनेश (11 महिने) 3. दुर्गेश साजन सिंह (20) 4.मुस्कान (14 ) 5.संजय (30 ) 6. देवकी रमेशचंद्र वर्मा 7. धनालाल गुर्जर 8. संतोष गंगाधर बारचे (45 ) 9. साविताबाई भगवान वर्मा 10. रामकुंवर दुलीचंद मानकर (60) 11. प्रियांशु (1 ) 12. आँचल सुंदरलाल वास्कले (18 ) 13. लक्ष्मीबाई महेश वास्कले (32) 14. मांगतीबाई मंशाराम वास्कले (75) 15. विजय 16. सुखदेव पाटीदार 17. मलुबाई 18. कान्हा संतोष पाटीदार 19. कल्लूबाई जोगिलाल पाटीदार 20. पिंकी कालू वास्कले 21.सुमित 22. अर्जुन