VIDEO: सोमय्यांचा एक फोटो आणि ठाकरे सरकारमध्ये खळबळ, कोण फाईली पुरवतंय आणि कोण चेक करतंय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत मंत्रालयात जाऊन नगरविकास खात्यातील काही फाईली चेक केल्या. त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरून किरीट सोमय्यांवर टीका होत असून काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.
संदीप राजगोळकर, नवी दिल्ली: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी मुंबईत मंत्रालयात (mantralaya) जाऊन नगरविकास खात्यातील (urban development) काही फाईली चेक केल्या. त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरून किरीट सोमय्यांवर टीका होत असून काँग्रेसने (congress) या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. तर सोमय्या यांनी आघाडी सरकारला भीती कशाची वाटतेय? मी कोणत्या कोणत्या फायली तपासल्या याची भीती वाटतेय का? असा सवाल केला. माझ्यावर आधीच आघाडी सरकारमधील नेत्यांनी 13 गुन्हे दाखल केले आहेत. आता आणखी एक गुन्हा दाखल करतील, असं विधानही किरीट सोमय्या यांनी केलं आहे. दिल्लीत टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना सोमय्या यांनी हे विधान केलं. मात्र, सोमय्या यांनी नेमक्या कोणत्या फायली चेक केल्या यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आघाडी सरकारला भीती कसली आहे? कोणत्या कोणत्या फायली तपासल्या त्याची का? वायकरांची फाईल होती की सरनाईकांची फाईल होती? किंवा अशोक चव्हाणांची होती? मला वाटतं बहुतेक भीती ती आहे. आम्हाला जगभरातून माहिती मिळत असते. वेगवेगळ्या स्तरातून माहिती मिळते. घोटाळेबाजांची माहिती मिळते. उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाणांपर्यंतची माहिती मिळत असते. मी कुठेही जाणार, जातो. माहिती गोळा करतो आणि घोटाळेबाजांना पाठवतो, असं किरीट सोमय्या म्हणाले.
माझ्यावर 13 केसेस
आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्यावर धमक्यांचे, अब्रुनुकसानीचे अशा 13 केसेस लावल्या आहेत. माझ्यावर माझ्या कुटुंबावर चौकश्या लावल्या आहेत. आता आणखी एक चौकशी होऊन जाऊ दे, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसचा आरोप काय?
नगरविकास खात्यात फायली चेक करत असल्याचा सोमय्या यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याला काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आक्षेप घेतला. भाजप नेत्यांची मानसिक स्थिती अत्यंत हालाखीची झाली आहे. सत्ता गेल्यापासून त्यांचं वर्तन बेफाम झालं आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी भाजप नेते कोणत्याही स्तरावर जात आहेत. किरीट सोमय्या मंत्रालयात जाऊन अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फायली तपासत होते. त्याची चौकशी केली पाहिजे. त्यांनी माहिती अधिकारात परवानगी घेतली नसेल तर हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे त्याची चौकशी व्हावी. चौकशी अंती हा गुन्हा घडल्याचं सिद्ध झालं तर ऑफिशियल सिक्रेट अॅक्टनुसार कारवाई करावी, तसेच सरकारी कार्यालयात घुसखोरी करण्याच्या कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिज, असं सावंत म्हणाले.
VIDEO : मी कुणाच्या फाइल्स बघितल्या याची भीती वाटते काय? Kirit Somaiya यांचा काँग्रेसला पलटवार | New Delhi @KiritSomaiya
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaH1Qy pic.twitter.com/XBEyjqnkL8
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2022
संबंधित बातम्या:
VIDEO: पूनम महाजन सध्या कुठे आहेत?, संजय राऊतांचा सवाल; महाजनांवरील कार्टुनबाबत केला खुलासा
Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!