Farmer Protest : मोदींच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी बैठक बोलावली, पुढील रणनीती ठरवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर शनिवारी किसान संयुक्त मोर्चाने (Kisan Morcha) बैठकीचं आयोजन केलं आहे.

Farmer Protest : मोदींच्या आवाहनानंतर शेतकऱ्यांनी बैठक बोलावली, पुढील रणनीती ठरवणार
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 6:16 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं भाषण आणि कृषी मंत्रालयाच्या सचिवांनी पाठवलेल्या चिठ्ठीनंतर, रणनीती ठरवण्यासाठी शनिवारी किसान संयुक्त मोर्चाने (Kisan Morcha) बैठकीचं आयोजन केलं आहे. पंतप्रधानांनी किसान सन्मान योजनेच्या (PM Kisan Samman Yojana ) सातव्या हप्त्याचं वितरण केलं. यावेळी मोदींनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिल्लीतील आंदोलनावर भाष्य केलं. “काही राजकीय पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. कोणतेही मुद्दे असतील तर चर्चेला या, मात्र माथी भडकवू नका” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Kisan Morcha to meet tomorrow after PM Narendra Modi appeal )

मोदींच्या या आवाहनानंतर शेतकरी संघटना पुढील रणनीती ठरवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय संघटनेची आज बैठक होऊ शकली नाही. केवळ पंजाबच्या संघटनांची बैठक झाली. राष्ट्रीय शेतकरी संघटना उद्या म्हणजे शनिवारी बैठक घेणार आहे.

9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वितरित केला. त्यानुसार 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 18 हजार कोटी ट्रान्सफर करण्यात आले. यावेळी मोदी म्हणाले, “शेतकऱ्यांना बदनाम करण्याची राजकारण होत आहे. आधीच्या सरकारांमुळे शेतकऱ्यांप्रती धोरणचं ठरलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं वाटोळ झालं”

वाचा :  गणेशजी खरं खरं सांगा, कमाई जास्त कुठे? लातूरच्या शेतकऱ्याला मोदींचा लाईव्ह सवाल

पंतप्रधानांनी नव्या कृषी धोरणाचं समर्थन करताना, आधुनिक शेतीवर भर दिला. शेतकऱ्यांचा खर्च कमी करुन उत्पन्न वाढवणे हे ध्येय असल्यांचं मोदी म्हणाले. पंतप्रधान पीक विमा योजना, किसान कार्ड, किसान सन्मान योजना अशा योजनांमुळे शेती सुलभ होईल असा दावा मोदींनी केला.

शेतकरी आंदोलनाचा 30 वा दिवस

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेल्या 30 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे.

Farmers Protest | शेतकरी आंदोलन : संभाव्य तोडगा काय?

कोणते कृषी कायदे वादग्रस्त?

  • कृषी उत्पादने,व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020
  • हमी भाव व कृषी सेवांचा शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण ) करार कायदा 2020
  • जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा 2020

शेतकऱ्यांना चिंता कशाची?

  1. हमी भाव राहील असे सरकार तोंडी म्हणतंय, त्याची खात्री नाही
  2. सरकार हमी भावाने शेतमाल खरेदी करणे बंद करेल
  3. खाजगी कंपन्या हमी भावाने शेतमाल घेतील याची खात्री नाही
  4. कृषी कायद्यांमुळे खाजगी कंपन्यांची खरेदी दरात मनमानी होईल
  5. 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी यंदापासून राज्यांना बंद
  6. शक्तीशाली कंपन्या शेतकऱ्यांचे शोषण करतील, फसवतील

शेतकऱ्यांच्या काय आहेत मागण्या?

  1. तिन्ही कृषी कायदे मागे घ्या
  2. हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी अपराध ठरवा
  3. किमान हमी भावाचा कायदा करा
  4. 3% ग्रामीण पायाभूत सुविधा निधी पुन्हा सुरु करा
  5. सरकारकडून धान्य खरेदी चालूच ठेवा
  6. कृषी क्षेत्रात भांडवलदारांना मनाई करा
  7. राज्यांच्या वैधानिक अधिकारांचा सन्मान करा

(Kisan Morcha to meet tomorrow after PM Narendra Modi appeal )

संबंधित बातम्या:  

Delhi Farmer Protest | कृषी कायदा, शेतकऱ्यांच्या मागण्या ते सरकारची बाजू, एका क्लिकवर वाचा सगळी माहिती

PM Modi LIVE : पश्चिम बंगाल सरकारच्या आडमुठ्या भूमिकेमुळे तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान; मोदींचा नाव न घेता ममतांवर निशाणा

Farmers Protest | शेतकरी आंदोलन : संभाव्य तोडगा काय?

केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील बैठक निष्फळ; आंदोलन सुरुच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.