DRDO च्या ‘अँटी-ड्रोन सिस्टम’ची वैशिष्ट्ये काय? दहशतवादाचा सामना करण्यात मोठी भूमिका निभावणार
भारताच्या DRDO या संस्थेने तयार केलेल्या अँटी-ड्रोन सिस्टमची जोरदार चर्चा सुरू झालीय. DRDO ची ही अँटी-ड्रोन यंत्रणा छोट्या ड्रोनचा शोध लावून ते हल्ले निकामी करते.
नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर आता दहशतवाद्यांच्या हाती ड्रोन हे नवं शस्त्र आल्याचं उघड झालंय. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलासाठी ही चिंताजनक गोष्ट आहे. कारण पाकिस्तानच्या सीमेवरील भारतीय हद्दीत रात्रीच्या वेळी ड्रोनच्या हालचाली दिसत आहेत. त्यामुळे भारत या ड्रोनचा सामना करण्यासाठी भारताकडे काय कोणती यंत्रणा आहे असा सवाल विचारला जातोय. यानंतर आता भारताच्या DRDO या संस्थेने तयार केलेल्या अँटी-ड्रोन सिस्टमची जोरदार चर्चा सुरू झालीय. DRDO ची ही अँटी-ड्रोन यंत्रणा छोट्या ड्रोनचा शोध लावून ते हल्ले निकामी करते (Know all about DRDO anti drone system).
दहशतवाद्यांविरोधात भारताची चोख तयारी
DRDO ने विकसित केलेल्या या अँटी-ड्रोन यंत्रणेचा भारतात सर्वात पहिल्यांदा वापर 2020 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व्हीव्हीआयपी लोकांना सुरक्षा देण्यासाठी करण्यात आला. याशिवाय अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये आले तेव्हा देखील या यंत्रणेची तैनाती करण्यात आली होती. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी परेड दरम्यान देखील ही यंत्रणा वापरण्यात आली.
डीआरडीओची ही यंत्रणा 3 किलोमीटरच्या टप्प्यात काम करते
आता जम्मूमधील एअरबेसच्या टेक्निकल भांगात ड्रोन हल्ला झाल्यानंतर आता पुन्हा डीआरडीओच्या ड्रोन विरोधी यंत्रणेची जोरदार चर्चा सुरू आहे. ही यंत्रणा दहशतवाद्यांचे ड्रोन शोधून उद्ध्वस्त करु शकते, असं बोललं जातंय. डीआरडीओची ही यंत्रणा 3 किलोमीटरच्या टप्प्यात येणाऱ्या ड्रोनचा शोध घेऊन त्याला जाम करु शकते. इतकंच नाही तर ही यंत्रणा 1 ते 2.5 किलोमीटरच्या टप्प्यातील ड्रोनला आपल्या लेजर बीमने लक्ष्य करत खाली पाडू शकते.
शत्रूच्या ड्रोनला हवेतच शोधून नष्ट करण्याची क्षमता
डीआरडीओची ही अँटी ड्रोन सिस्टम सुरक्षा दलाला मिळाली तर सैनिका ठिकाणांना अधिक सुरक्षित करण्यास मोठी मदत होईल. ही यंत्रणा शत्रूच्या ड्रोनला हवेतच शोधून नष्ट करेल. यामुळे पाकिस्तानला सडेतोड उत्तर मिळेल. एका वृत्तानुसार डीआरडीओने आपल्या अँटी-ड्रोन सिस्टमच्या उत्पादनाचं काम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला म्हणजेच BEL ला सोपवलं आहे. डीआरडीओ आपल्या ड्रोन विरोधी यंत्रणेचं तंत्रज्ञान इतर खासगी कंपन्यांसोबत शेअर करायलाही तयार असल्याचं सांगितलं जातंय. त्यासाठी खासगी कंपन्यांना आधी परवाना घ्यावा लागेल.
हेही वाचा :
Pakistan spy drone | पाकिस्तानचा स्पाय ड्रोन पाडला, मोठा शस्त्रसाठा जप्त
Drone Attack: भारतासाठी दहशतवाद्यांचा नवा हल्ला धोकादायक ठरु शकतो, काय आहे ड्रोन स्ट्राईक?
हिरो होंडाची अनोखी टेक्नॉलॉजी, आता मोटारसायकलवर ड्रोनही स्वार होणार
व्हिडीओ पाहा :
Know all about DRDO anti drone system