AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunder bans : इश्क़ नहीं आसाँ म्हणत बांग्लादेशी प्रेयसीने पार केला सुंदरबन, लग्न होताच झाली अटक

कृष्णा मंडलची भारतात राहणाऱ्या आशिक मंडलसोबत काही काळापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती, त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे दोघानींही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Sunder bans : इश्क़ नहीं आसाँ म्हणत बांग्लादेशी प्रेयसीने पार केला सुंदरबन, लग्न होताच झाली अटक
कृष्णा मंडलImage Credit source: tv9
| Updated on: Jun 01, 2022 | 4:23 PM
Share

सुंदरबन : प्रेम (Love) हे प्रेम असतं. मग ते कोठे? कोणाशी? आणि कसे ही होऊ शकते. त्यामुळेच ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लेजीए इक आग का दरिया है और डूब के जाना है… या शायरी प्रमाणे खरे प्रेम करणारे सगळे अडथळे पार करतात. मग त्या धर्माच्या सीमा असोत की देशांच्या. प्रेम करणारे त्या तोडतातच. अशा प्रेमवीरांच्या बातम्या आपण कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लावले होते त्यावेळी वाचल्या आहेत. पण आता सगळे सुरळीत झाले आहे. मग यात काय नवे असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. पण यावेळी प्रेमासाठी सीमा ही मुलाने ओलांडलेली नाही तर एका मुलीने हा कारनामा केला आहे. तिने चक्क बांगलादेशातून भारतात प्रवेश केला. फक्त प्रवेश केला नाही तर ती प्रियकराला भेटण्यासाठी प्राण्यांनी भरलेला सुंदरबन डेल्टा (Sunderbans Delta) पार केला. तिचे नाव कृष्णा मंडल असे असून वय जेमतेम 22 वर्ष आहे. पण हे सुख तिला जास्त वेळ मिळालं नाही. कारण कृष्णा मंडल (Krushna Mandal) भारतात आली तिचे प्रेमीबरोबर लग्नही झालं. पण पोलिसांनी अटक केली. आता पोलिसांनी तिला बांगलादेशला परत पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे ज्या प्रेमासाठी वाघांनी भरलेला सुंदरबन डेल्टा पार केला, त्याच प्रीयकारापासून तिची ताटातूट होणार आहे.

बांगलादेशच्या कृष्णा मंडलची कहाणी

प्रेमाच्या अनेक कथा आहेत. त्यात अनेक नावे ही अजरामर आहेत. अनेक प्रेमी आपल्या प्रायकरासाठी जीव देण्यासाठीही तयार असतात. पण आपले प्रेम ते मिळवतातच. असेच काहीसे बांगलादेशच्या कृष्णा मंडलची कहाणी. कृष्णा मंडलची भारतात राहणाऱ्या आशिक मंडलसोबत काही काळापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती, त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यामुळे दोघानींही लग्न करण्याचा निर्णय घेतला. कृष्णाकडे पासपोर्ट नसल्याने तिला भारतात प्रवेश मिळत नव्हता. वैतागून तिने एक धाडसी निर्णय घेतला आणि सुंदरबन डेल्टा पार करण्याचा निश्चय केला. आणि ती पोहून भारतात आली.

पत्नीला अटक, पती नाराज

सुमारे तासभर नदीत पोहत कृष्णा भारताच्या सीमेवर पोहोचली. गेल्या आठवड्यात कोलकाता येथील मंदिरात तिने आपल्या प्रियकराबरोबर लग्नही केले. पण या प्रेमाला कोणाचीतरी दृष्ट लागली आणि याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांकडून कृष्णाला अटक करण्यात आली. त्याच्याकडे भारतात येण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बांगलादेश सीमेवर बांगलादेश अधिकाऱ्यांच्या ताब्यात तिला दिले जाईल. आता कृष्णाचा पती आशिक खूप अस्वस्थ झाला असून कायदेशीर मदत घेण्याचा तो विचार करत आहे.

अशी घुसखोरी यापूर्वीही

सुंदरबनमध्ये अशा प्रकारे पोहून भारतात घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीलाही असाच एक तरुण चॉकलेट खरेदीसाठी भारतात दाखल झाला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला 15 दिवसांची कोठडी सुनावली होती.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.