कुंभमेळा असो की रमजान; कुठेही कोरोना नियमांकडे दुर्लक्ष होता कामा नये: अमित शहा
देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. देशात रोज कोरोनाचे धक्कादायक आकडे येत आहेत. (Kumbh Mela Or Ramadan Corona Protocol Cannot Be Ignored Anywhere: Amit Shah )
नवी दिल्ली: देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. देशात रोज कोरोनाचे धक्कादायक आकडे येत आहेत. कोरोना बळींचे आकडेही त्याच प्रमाणात वाढताना दिसत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संसर्ग वेगाने वाढत असतानाच कुंभ मेळा आणि रमजानमध्ये मात्र कोरोनाच्या नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे. त्याची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गंभीर दखल घेतली आहे. (Kumbh Mela Or Ramadan Corona Protocol Cannot Be Ignored Anywhere: Amit Shah )
कुंभ मेळा आणि रमजानमध्ये कोरोना नियमांचं पालन केलं जात नसल्याने अमित शहा यांनी त्यावर कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुंभ मेळा आणि रमजान उत्सवात भाग घेणारे लोक कोरोना नियमांचं पालन करण्यात अपयशी ठरले आहेत. कोरोना असो की रमजान कुठेही कोरोना नियमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळेच यंदाचा कुंभ मेळा प्रतिकात्म साजरा करण्याचं आम्ही आवाहन केलं आहे, असं शहा म्हणाले.
संतांचा सकारात्मक प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: साधू संतांना आवाहन केलं आहे. कुंभ मेळावा प्रतिकात्मक साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. संतानी त्यांच्या आवाहनला प्रतिसादही दिला आहे. त्यानंतर 13 पैकी 12 आखाड्यांनी कुंभचं विसर्जन केलं आहे. संतांनी जनतेलाही कुंभला न येण्याचं आवाहन केलं आहे. मोदींच्या आवाहनानंतर प्रतिकात्मक कुंभ साजरा केला जात आहे. ही चांगली गोष्ट आहे, असं ते म्हणाले.
राज्यांना अधिकार
कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आम्ही राज्यांना अधिकार दिले आहेत. कारण प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यानुसार त्यांनी उपाययोजना केल्या पाहिजेत. म्हणूनच राज्यांना स्वत: निर्णय घेण्याचे अधिकार दिला आहेत. त्यांना केंद्र सरकार पूर्णपणे मदत करेल, असं शहा यांनी सांगितलं.
रेमडेसिवीरच उत्पादन होत आहे
यावेळी त्यांनी रेमडेसिवीरबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. रेमडेसिवीरचं उत्पादन होत आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जेव्हा मागणी वाढते तेव्हा लोक घाई गडबडीत मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन खरेदी करतात. त्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा होतो. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्यावरच इंजेक्शन विकत घ्या. त्या शिवाय इंजेक्शन खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी नागरिकांना केलं. (Kumbh Mela Or Ramadan Corona Protocol Cannot Be Ignored Anywhere: Amit Shah )
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 19 April 2021 https://t.co/PFmqyhoTl0 #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 19, 2021
संबंधित बातम्या:
लसीकरणाचा वेग वाढवा; मनमोहन सिंगांचे मोदी सरकारला 5 सल्ले
Fact Check | संपूर्ण देशात लॉकडाऊन लागणार का, खुद्द अमित शाह म्हणाले….
(Kumbh Mela Or Ramadan Corona Protocol Cannot Be Ignored Anywhere: Amit Shah )