AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LAC Face-off Live Updates : गलवान खोऱ्यातील संघर्ष हा चीनचा सुनियोजित कट, परराष्ट्र मंत्र्यांनी ठणकावलं

चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे. LAC Face off Live Updates

LAC Face-off Live Updates : गलवान खोऱ्यातील संघर्ष हा चीनचा सुनियोजित कट, परराष्ट्र मंत्र्यांनी ठणकावलं
| Updated on: Jun 17, 2020 | 7:09 PM
Share

नवी दिल्ली : चिनी सैन्यासोबत गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर भारतात संतापाची लाट उठली आहे. चिनी सैन्यांकडून झालेल्या भेकड हल्ल्यात भारताचे अनेक जवान जखमीही झाले. त्यामुळे शहीदांची संख्या वाढण्याची भीतीही आहे. दुसरीकडे या संघर्षात चीनचेही 43 सैनिक मृत किंवा जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. (LAC Face off Live Updates)

चीनच्या या भ्याड हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. या बैठकीमध्ये CDS प्रमुख बिपीन रावत, तिन्ही दलाचे प्रमुख उपस्थित आहेत.

देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. त्यापूर्वी मोदींनी गलवान खोऱ्यातील संघर्षावर भाष्य करुन, शहिदांना आदरांजली वाहिली.

LAC Face off Live Updates

  •  गलवान खोऱ्यातील संघर्ष हा चीनचा सुनियोजित कट, परराष्ट्र मंत्र्यांनी ठणकावलं
  • आम्हाला आमच्या जवानांवर अभिमान, जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, भारत जशास तसं उत्तर देण्यास सक्षम – पंतप्रधान नरेंद्र मोदी 
  • अहमदनगरला शिवसेनेच्यावतीने चायना मोबाईल फोडून आंदोलन करण्यात आलं. चीनने भारतावर हल्ला केला त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले ही दुःख देणारी घटना असून चीनचा माल वापरु नये असे आवाहन माजी आमदार अनिल राठोड यांनी केलं. तसेच यावेळी चीनचा माल विकत घेणार नाही अशी शपथ देखील घेण्यात आली. नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी चीनच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली, चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बैठक, 19 जूनला बैठकीचं आयोजन 
  • चीनची गुरगुर सुरुच, भारतानं रुळावर यावं, गलवान आमचंच, भारतानं सैन्याला शिस्तीत ठेवावं, LAC वर भारतानेच चिथावल्याचा कांगावा, भारतासोबतच्या संघर्षावर चीनची अधिकृत प्रतिक्रिया  
  • भारतीय जवानांना गलवान खोऱ्यात आलेलं वीरमरण अत्यंत वेदनादायी आणि अस्वस्थ करणारं आहे. सीमेवर तैनात असताना आपल्या जवानांनी धाडस आणि शौर्य दाखवत देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. जवानांचं बलिदान देश कधीच विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. देशाने त्यांच्या परिवाराच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
  • चीनचा कमांडिंग ऑफिसरही संघर्षात ठार,  ANI चे सूत्रांच्या हवाल्याने वृत्त, किमान 40 चिनी सैनिक ठार झाल्याचं वृत्त
  • गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकींमध्ये चीनलाही भारतीय जवानांनी मोठा दणका दिल्याचं वृत्त आहे. सीमेजवळ तणाव निर्माण झाल्यानंतर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका, स्ट्रेचरवरुन जखमी आणि मृत चिनी सैनिक नेण्यात आले. चीनच्या 40 हून अधिक सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र चीनने आपल्यावतीने याची पुष्टी केलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या प्रत्येक कुरापतीला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. चीनसोबत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतापुढे आता कोणते मार्ग असतील, हे पाहणं महत्त्वाचं आहे.  (LAC Face off Live Updates)

15 आणि 16 जूनच्या रात्री धुमश्चक्री

भारत-चीन यांच्यात झालेल्या (India-China Face Off  20 Javan Martyr) धुमश्चक्रीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही अधिकृत माहिती दिली. मंगळवारी (16 जून) दुपारी भारतीय सेनेचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाल्याची माहिती होती. तर, 17 जवान हे गंभीर जखमी झाले होते. मात्र, आता हे 17 जवान देखील शहीद झाले आहेत. त्यामुळे भारत-चीन संघर्षात आतापर्यंत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. ही संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वृत्तसंस्था एएनआयनुसार, या संघर्षात चीनच्या जखमी आणि मृत्यू झालेल्या सैनिकांची संख्या 43 वर पोहोचली आहे.

गलवान खोरे क्षेत्र महत्त्वपूर्ण का आहे?

“गलवान खोरे क्षेत्र भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण हे खोरे पाकिस्तान, चीनचे शिनजियांग आणि भारताच्या लडाख सीमा रेषेभागात पसरले आहे. 1962 साली भारत-चीन युद्धात हे क्षेत्र केंद्रस्थानी होतं”, असं जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे माजी प्रोफेसर आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक एसडी मुनी यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

संबंधित बातम्या : 

India-China Face Off | चीनसोबतच्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद, चीनच्या जखमी आणि मृत जवानांचा आकडा 43 वर

Galwan Valley conflict | भारत-चीनमध्ये गलवान खोऱ्यांवरुन नेमका तणाव काय?

India-China Territory Dispute | भारत-चीन नेमका सीमा-वाद काय?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.