लडाखजवळ LAC वरुन मागे हटण्यासाठी चीनच्या दोन अटी, भारताने लगोलग धुडकावल्या

भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला सीमावाद अद्याप संपलेला नाही.

लडाखजवळ LAC वरुन मागे हटण्यासाठी चीनच्या दोन अटी, भारताने लगोलग धुडकावल्या
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 11:17 AM

नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला सीमावाद अद्याप संपलेला नाही. (India China Ladakh Clash) दरम्यान, चीनने सीमावाद सोडविण्यासाठी भारतासमोर दोन अटी ठेवल्या आहेत. चीनच्या या अटी भारताने धुडकावल्या आहेत. या अटींद्वारे विवादित जमिनीवर कब्जा मिळवण्यासाठी चीन चालाखी करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु भारताने त्यांच्या अटी मान्य केल्या नाहीत. (Ladakh clash : India did not agree on China negotiation-deal)

पँगोंग लेक आणि गालवान व्हॅलीत सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात आतापर्यंत सात वेळा लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा झाली आहे. चर्चेची आठवी फेरी कधी होणार, हे अद्याप ठरलेलं नाही. तीन नोव्हेंबर रोजी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होऊ शकते.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीनने भारतासमोर दोन अटी ठेवल्या होत्या. भारतीय सेना फिंगर तीनपर्यंत पेट्रोलिंग करु शकते (गस्त घालू शकते). तर चीनची सेना फिंगर पाचपर्यंत पेट्रोलिंग करेल. याचाच अर्थ पहिल्या अटीद्वारे चीन भारताची सीमा निर्धारित करु पाहतोय, तर दुसऱ्या अटीद्वारे चीन स्वतःची सीमादेखील निर्धारित करु पाहतोय. चीनने म्हटले होते की, भारताने त्यांच्या अटी स्वीकारल्या तर चीन फिंगर चारमधील पर्वत आणि पँगाँग लेकच्या उत्तरेकडील त्यांच्या सैन्याला तिथून हटवेल.

याचाच अर्थ चीन सांगू पाहतोय की, विवादित फिंगर चारचा परिसर अक्साई चीनचा हिस्सा आहे. दोन्ही देशांमंधील वाद होण्यापूर्वी भारतीय लष्कर फिंग आठपर्यंत गस्त घालत होतं. त्यामुळेच भारताने चीनच्या या अटी मान्य केल्या नाहीत. विवादित एलएसीबाबत दोन्ही देशांची मतं वेगवेगळी आहेत. चीन म्हणतो की, एलएसी फिंगर चारच्या परिसरातून जाते, तर भारताचे म्हणणे आहे की, एलएसी फिंगर आठच्या परिसरातून जाते.

संबंधित बातम्या

कराड | लेह-लडाख सीमेवर जवान सचिन जाधव यांना वीरमरण, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मित्रता टिकवतो म्हणजे आम्ही कमजोर नाही, लडाख सीमेवरील भारतीय सैन्याच्या शौर्यानंतर भागवतांचा शत्रूराष्ट्रांना इशारा

लडाख-सियाचीनमध्ये जवानांना थंडीच्या कपड्यांच्या कमतरतेची तक्रार, संसदीय समिती लडाख दौऱ्यावर जाणार

चीनी लष्कराची पुन्हा आगळीक, पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन, भारतीय सैनिकांचे सडेतोड उत्तर

(Ladakh clash : India did not agree on China negotiation-deal)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.