AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lakhimpur Kheri Voilence: लाखीमपूर खीरी प्रकरणात नवा खुलासा; आशिष मिश्राच्या बंदुकीतून झाला होता गोळीबार 

फॉरेन्सिक लॅबच्या (foriensic lab report confirms bullet firing) अहवालात गोळीबाराची पुष्टी झाली आहे. हिंसाचाराच्या वेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) आणि त्यांचा जवळचा सहकारी अंकित दास यांनी परवाना असणाऱ्या (liscienced gun) बंदुकीतून गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Lakhimpur Kheri Voilence: लाखीमपूर खीरी प्रकरणात नवा खुलासा; आशिष मिश्राच्या बंदुकीतून झाला होता गोळीबार 
File photo Ashish Mishra
Follow us
| Updated on: Nov 09, 2021 | 7:28 PM
उत्तर प्रदेशातील लखीमपूर-खीरी जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारप्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात गोळीबाराची पुष्टी झाली आहे. हिंसाचाराच्या वेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा आणि त्यांचा जवळचा सहकारी अंकित दास यांनी परवाना असणाऱ्या बंदुकीतून गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता तिथल्या बॅलेस्टिक अहवालात गोळी असल्याची पुष्टी झाली आहे. यावरुन हे स्पष्ट झाले आहे की लखीमपूर खेरी जिल्ह्यातील टिकुनिया येथे 3 ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचारात परवानाधारक शस्त्रांनी गोळीबारही झाला होता. (Lakimpur kheri voilence case forensic lab report confirms bullets firing from licensed gun of Ashish Mishra son of BJP minister Ajay Mishra)

आशिष मिश्राच्या संकटात वाढ

या प्रकरणात शेतकऱ्यांनी आरोप केला होता की भाजप नेत्यांनी गोळीबार केला. त्यानंतर लखीमपूर पोलिसांनी अंकित दासची रिपीटर बंदूक, पिस्तूल आणि आशिष मिश्राची रायफल आणि रिव्हॉल्व्हर तपासासाठी ताब्यात घेतले होते. चारही शस्त्रे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आशिष मिश्रा यांच्या परवानाधारक शस्त्राने गोळीबार झाल्याचे फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट झाल्याने, आता आशिष मिश्रा आणि अंकित दास यांच्या अडचणी वाढू शकतात. सध्या दोघेही तुरुंगात असून या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

3 ऑक्टोबरला उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या लखीमपूर खीरीतील टिकुनियाच्या भेटीदरम्यान शेतकऱ्यांचा नवीन शेती कायद्यांच्या विरोधात आंदोलन चालू होते. त्याचवेळी एक गाडीने आंदोलक शेतकऱ्यांना चिरडले. यात चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर झालेल्या मारहाणीमध्ये आणखी चार जणांचा मृत्यू झाला, ज्यात भाजपचे दोन कार्यकर्ते, एक ड्रायव्हर आणि एका पत्रकाराचा सामावेश आहे. या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक केली. तो तुरुंगात आहे. त्याचबरोबर या प्रकरणात त्याच्या अनेक साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या सर्व आरोपी तुरुंगात आहेत.
Other News
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी
हवा, पाणी, जमिनीवरून पाकिस्तानला घेरणार; भारत करणार क्षेपणास्त्र चाचणी.
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक
श्रीगंगागनगरमध्ये बॉर्डवर बीएसएफकडून पाकिस्तानी जवानाला अटक.
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका
लाडक्या बहिणींना 500 रुपये देणं ही फसवणूक; राऊतांची महायुतीवर टीका.
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?
पीएम मुद्रा योजनेनं पालटलं कोट्यवधी भारतीयांचं नशीब; कसा करायचा अर्ज?.
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी..
शेतकरी ओळखपत्र नसेल तर मिळणार नाहीत लाभ; अशी करा नोंदणी...
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत
पंतप्रधान मुर्ख बनवतात, पाकिस्तानचा काहीही बदला घेतला नाही - संजय राऊत.
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका
भारताचा पाकिस्तानला पूर्णपणे व्यापारावर बंदीचा दणका.
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव
सर्जिकल स्ट्राईकच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कॉंग्रेस खासदाराचं घुमजाव.
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.