लालू प्रसाद यादव दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल, कुटुंबीयही पोहोचले

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीच्या AIMS रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. लालू यादव यांना निमोनिया झाल्यानंतर रिम्स प्रशासनाने त्यांना दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला.

लालू प्रसाद यादव दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात दाखल, कुटुंबीयही पोहोचले
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 10:48 PM

नवी दिल्ली : चारा घोटाळा प्रकरणात शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. लालू यादव यांना निमोनिया झाल्यानंतर रिम्स प्रशासनाने त्यांना दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी 5 वाजचा एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना दिल्लीला रवाना करण्यात आलं. राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान अर्थात रिम्सचे निर्देशक डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी सांगितलं की, यादव यांना दोन दिवसांपासून श्वसनाला त्रास होत होता. त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना न्युमोनिया झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांचं वय लक्षात घेता त्यांना दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रसाद म्हणाले.(Lalu Prasad Yadav’s condition critical, admitted to Delhi AIIMS)

कारागृह प्रशासनाच्या सल्ल्यावर रिम्सने 8 विविध विशेषज्ञांचा एक मेडिकल समिती गठीत केली. या समितीनं लालू यांच्या आरोग्याची तपासणी केली आणि त्याचा अहवाल मिळताच त्यांना AIMS मध्ये रवाना करण्यात आलं.

तेजस्वी, तेजप्रताप, राबडी देवी AIIMS मध्ये दाखल

लालू प्रसाद यादव यांना AIIMS मध्ये दाखल करण्यात आल्यानंतर लालू यांचे पुत्र माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव आणि पत्नी राबडी यादव AIIMS मध्ये दाखल झाले आहेत. तत्पूर्वी तेजस्वी यादव यांनी ट्वीट केलं की, ‘लालूजी यांना श्वसनाला त्रास होत असल्याची माहिती मिळत आहे. त्यांची किडनी 25 टक्केच काम करत आहे. मी, आई आणि भाऊ रांची जात आहोत. आम्ही त्यांना भेटण्यासाठी विशेष परवानगी मागितली आहे.’

लालू यादव यांच्या अनेक टेस्ट पूर्ण

शुक्रवारी लालू प्रसाद यादव यांच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. ज्यात ईको, ईसीजी, अल्ट्रासाऊंड, केयूबीपी आणि एचआरसीटी या चाचण्यांचा समावेश होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निमोनिया सोडला तर त्यांच्या अनेक चाचण्या सामान्य आल्या आहेत. त्यांचा न्युमोनिया कुठल्या स्तरावर पोहोचला आहे? आणि त्यांच्या लंग्समध्ये किती संक्रमण आहे? हे चाचणी अहवालातूनच समोर येईल.

संबंधित बातम्या :

लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली, श्वास घेण्यासाठी होतोय त्रास

लालू प्रसाद यादव यांच्या किडनीचं केवळ 25 टक्के फंक्शन; प्रकृती बिघडली

Lalu Prasad Yadav’s condition critical, admitted to Delhi AIIMS

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.