Tribute to Lata Mangeshkar : वाळूतून शिल्प साकारत लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली, पाहा Video
Tribute to Lata Mangeshkar : सोशल मीडियावर लोक लतादीदींना आपापल्या शैलीत आदरांजली वाहतात. वाळू कलाकार (Sand Artist) सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनीही भारतरत्न लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली (Tribute) वाहिली.
Tribute to Lata Mangeshkar : ज्येष्ठ पार्श्वगायिका लता मंगेशकर आता आपल्यात नाहीत. रविवारी सकाळी वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर लोक लतादीदींना आपापल्या शैलीत आदरांजली वाहतात. वाळू कलाकार (Sand Artist) सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनीही भारतरत्न लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली (Tribute) वाहिली. सुदर्शन म्हणाले, ‘लता दीदींच्या जाण्याने एका सुवर्णयुगाचा अंत झाला, पण त्यांचा आवाज सदैव अमर राहील.’ लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाला सुदर्शन त्यांचा वाळूचा पुतळा बनवतात. गेल्या महिन्यात लता मंगेशकर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. तेव्हापासून सोशल मीडियावर त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनांचा फेरा सुरू झाला. पण लता दीदींना वाचवता आले नाही.
‘मेरी आवाज ही पहचान है’
ओडिशाचे वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांना लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा त्यांनी पुरीतील समुद्रकिनाऱ्यावर वाळूतून त्यांचा पुतळा कोरून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. सुदर्शन पटनायक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर ‘मेरी आवाज ही पहचान है’ असा व्हिडिओ शेअर केला आहे.
Meri Awaaz hi Pehechan hai.. I offer my humble tributes to Nightingale of India #LataMangeshkar through this sandart at Puri beach. May Mahaprabhu Jagannath grant sadgati to the legend. Om Shanti ?? pic.twitter.com/ksTgZfeX6u
— Sudarsan Pattnaik (@sudarsansand) February 6, 2022
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. लता मंगेकर यांच्या आप्तेष्ट आणि कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त चित्रपट जगतापासून ते राजकीय आणि क्रीडा जगतातील सेलिब्रिटींनीही अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली.
आणखी बातम्या :