नितिन गडकरी यांच्यावर विरोधी पक्षातला हा नेता फिदा, ट्वीट करुन आभारही मानले

केंद्र सरकारमधील धडाकेबाज कामगिरीमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या चाहत्यांमध्ये वाढच होत आहे.

नितिन गडकरी यांच्यावर विरोधी पक्षातला हा नेता फिदा, ट्वीट करुन आभारही मानले
NITIN GADKARIImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 2:08 PM

दिल्ली : आपल्या कामगिरीने नेहमीच चर्चेत असलेले भाजपाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( NITIN GADKARI )  यांचे कौतूक आता विरोधी पक्षातील मंत्रीही करीत आहेत. समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव ( SHIVPAL YADAV ) यांचे काका शिवपाल यादव यांनी आता नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. शिवपाल यांनी सोमवारी एक ट्वीट करून गडकरी यांचे आभार मानले आहेत. वास्तविक गडकरी यांना त्यांच्या कार्यशैलीच्या धडाक्याबद्दल भाजपा पक्षापेक्षा पक्षा बाहेरही ज्यादा चाहता परिवार आहे. आता त्यांची विरोधी पक्षातूनही वाहवा केली जात असल्याने चर्चेला आणखीनच उत आला आहे.

लखनऊमध्ये आयोजित ग्लोबल इन्वेस्टर समिटमध्ये शनिवारी आपल्या भाषणात समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा उल्लेख केला होता. गडकरी यावेळी म्हणाले होते, ‘मुलायम सिंह यादव यांनी लोकसभेत एकदा म्हटले होते की लोहीया यांनी ज्यात माणसाला वाहण्याचे काम माणूसच करीत असेल. त्या सायकल रिक्षात आपण आयुष्यात कधीच बसणार नाही. गडकरी यांच्या या वक्तव्यावर लोकांनी खूप टाळ्या वाजवत प्रतिसाद दिला होता. गडकरी नंतर म्हणाले की लोकसभेत आपण विधेयक पास केले, त्यानंतर त्याचा लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याचे त्यांनी म्हटले.

देशात एक कोटी जनता अशाप्रकारे मनुष्याला वाहण्याचे काम करत होती. ई- रिक्षा आली, आज एक कोटी लोकांपैकी ९० टक्के लोक ई-रिक्षा चालवित आहेत, आणि कमीत कमी एक हजार रूपये कमवित आहेत असे सांगत केंद्रीय मंत्री गडकरी पुढे म्हणाले की मला आनंद आहे की या देशातून ही अमानवीय प्रथा बंद झाली आहे. या ई-रिक्षासाठी अजिबात खर्च येत नाही असेही त्यांनी सांगितले. गडकरी यांनी आपल्या भाषणात मुलायम सिंह यांची आठवण  काढल्याबद्दल समाजवादी नेते शिवपाल यादव यांनी गडकरी यांचे खास आभार मानले आहेत. शिवपाल यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, लोहीयाजी आणि नेताजी यांचे विचार लोक अनेक युगे काढीत राहतील, असे होते आमचे लोहीया जी आणि नेताजी , आभार गडकरी जी  हीच खरी लोकशाही आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.