AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलाही वाटतं मिलिंद देवरासारख्या नेत्यांनी काँग्रेस सोडावी; राहुल गांधी यांचं मोठं विधान

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा देशव्यापी दौरा सुरू केला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांची न्याय यात्रा सुरू झाली आहे. त्यांच्या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक ठिकाणी राहुल गांधी यांचं जंगी स्वागत केलं जात आहे. अनेक लोक राहुल गांधी यांना भेटून त्यांच्या व्यथा, वेदना सांगताना दिसत आहेत. तर काही लोक केंद्र सरकारवर संतापही व्यक्त करताना दिसत आहेत.

मलाही वाटतं मिलिंद देवरासारख्या नेत्यांनी काँग्रेस सोडावी; राहुल गांधी यांचं मोठं विधान
RAGA Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 8:20 PM

बहरामपूर | 2 फेब्रुवारी 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये आहे. यावेळी त्यांनी पक्षातून गेलेल्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. हिंमत बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरासारख्या नेत्यांनी पार्टी सोडलीच पाहिजे. तसं मला वाटतं. कारण ते विचारधारेशी सहमत नाहीत, असं मोठं विधान राहुल गांधी यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हिमंत बिस्वा सरमा यांनी 2014मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. आज ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. तर मिलिंद देवरा यांनी गेल्या महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

डिजिटल मीडिया योद्धांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी हे विधान केल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसने जे नियम घालून दिलेत त्याचं संरक्षण केलं पाहिजे. सिद्धांतांचं पालन केलं पाहिजे. मला वाटतं हिमंत बिस्वा सरमा आणि मिलिंद देवरा सारख्या लोकांनी काँग्रेसमधून निघून जावं. मी या मतावर येऊन ठेपलो आहे. हिमंत हे एका विशेष प्रकारच्या राजकारणाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. हे काँग्रेसचं राजकारण नाही, असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा सुरू आहे. 25 जानेवारी रोजी ही यात्रा आसाममध्ये आली. तिथून ही यात्रा पश्चिम बंगालमध्ये पोहोचली. आता पुढच्या टप्प्यात ही यात्रा झारखंडमध्ये जाणार आहे.

अन् काँग्रेसचं सरकार गेलं

मिलिंद देवरा यांनी काँग्रेससोडून शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटाची भाजपसोबत युती आहे. त्यामुळे आता देवरा यांचा भाजपसोबतचा नवा प्रवास सुरू झाला आहे. तर हिमंत बिस्वा यांनी थेट भाजपमध्येच प्रवेश केला होता. 2014 मध्येच हिमंत बिस्वा हे भाजपमध्ये आले. आज ते आसामचे मुख्यमंत्री आहेत. तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनीही पक्षांतर्गत वादाला कंटाळून काँग्रेस सोडली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार आलं होतं.

कुणीकुणी काँग्रेस सोडली

देशात भाजपचं सरकार आल्यापासून काँग्रेसला अनेक दिग्गज नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली. कपिल सिब्बल, ज्योतिरादित्य सिंधिया, जितिन प३साद, सुनील जाखड, प्रियंका चतुर्वेदी, हार्दिक पटेल, सुष्मिता देव आणि आरपीएन सिंह आदी नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. काँग्रेस सोडताना प्रत्येकांनी वेगवेगळी कारणे दिली होती.

इंडिया आघाडी धोक्यात

दरम्यान, भाजपला पराभूत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. नितीशकुमार यांनी भाजपची साथ धरली आहे. तर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला अधिक जागा देण्यास नकार दिला आहे. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीही काँग्रेसला अधिक जागा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचं अस्तित्व निवडणुकीआधीच संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.