‘आंदोलक शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधाही केंद्रानं रोखल्या,’ विरोधी पक्षाच्या खासदारांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज गाझीपूर सीमेवर जात परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत 8 ते 10 विरोधी पक्षांचे खासदार आणि नेते उपस्थित होते.

'आंदोलक शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधाही केंद्रानं रोखल्या,' विरोधी पक्षाच्या खासदारांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 9:51 PM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमेवर केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन तब्बल 71 दिवसांपासून सुरुच आहे. त्यावरुन काँग्रेससह सर्वच विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज गाझीपूर सीमेवर जात परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत 8 ते 10 विरोधी पक्षांचे खासदार आणि नेते उपस्थित होते. गाझीपूर बॉर्डरवर दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेल्या नाकाबंदीवर हे नेते पोहोचले असता त्यांना पोलिसांनी रोखलं.(Leaders of Opposition’s letter to Lok Sabha Speaker, NCP MP Supriya Sule Tweet)

दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “दिल्ली येथे गेली ७० दिवसांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलभूत सुविधा देखील केंद्र सरकारने रोखल्या आहेत.याबाबत माननीय लोकसभा अध्यक्षांना विरोधी पक्षांच्या खासदारांनी मिळून पत्र लिहिले आहे.या पत्रात आम्हा सर्वांनी गाझीपूर बॉर्डर येथे आलेला कटू अनुभव नमूद केला आहे”, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

त्याचबरोबर “निर्वाचित लोकप्रतिनिधींनाही आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना भेटू दिले जात नाही हे खेदजनक असून लोकसभा अध्यक्षांनी लोकप्रतिनिधींच्या हक्कांचे संरक्षण करावे अशी विनंती या पत्रात केली आहे.यासोबतच शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर संसदेत चर्चा घडवून आणावी अशी मागणी देखील केली आहे,” असंही सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.

संजय राऊतांनी घेतली राकेश टीकैत यांची भेट

शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. राऊत यांनी त्यांच्याशी चर्चा करुन शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा मेसेज त्यांना दिला. तसंच मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंच्या सूचनेवरुन आम्ही भेटायला आल्याचंही त्यांनी सांगितलं.

टीकैत यांची भेट घेतल्यानंतर राऊत यांनी केंद्र सरकावर जोरदार प्रहार केले. देशात लोकशाही शिल्लक आहे काय, असं विचारत केंद्र सरकारने शेतकऱ्यांशी ज्या प्रकारे वागत आहे ते निषेधार्ह असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

संबंधित बातम्या :

मी शेतकऱ्याची लेक, बळीराजाला पाठिंबा देण्यासाठी गाझीपूर सीमेवर जाणार : सुप्रिया सुळे

Farmer Protest : 3 क्विंटल गव्हाची किंमत 1 तोळा सोन्याएवढी करा – राकेश टिकैत

Leaders of Opposition’s letter to Lok Sabha Speaker, NCP MP Supriya Sule Tweet

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.