Chandrayaan-3 Update | चांद्रयान 3 विरुद्ध लुना 25, दक्षिण ध्रुवावर पहिलं कोण पोहोचणार?

Chandrayaan-3 Update | भारताची अत्यंत जवळच्या मित्र देशाबरोबर स्पर्धा. त्यांच यान सुद्धा 23 ऑगस्टलाच चंद्रावर होणार लँड. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पहिला कुठला देश पोहोचणार?. चांद्र मोहिमेची स्पर्धा झाली तीव्र.

Chandrayaan-3 Update | चांद्रयान 3 विरुद्ध लुना 25, दक्षिण ध्रुवावर पहिलं कोण पोहोचणार?
Luna 25 missionImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 8:03 AM

नवी दिल्ली : सध्या देशात चर्चा आहे ती, भारताच्या मिशन चांद्रयान-3 ची. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने 14 जुलैला चांद्रयान-3 लाँच केलं. सर्वप्रथम चांद्रयान-3 ला पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आलं. त्यानंतर टप्याटप्याने चांद्रयान 3 चा कक्षा विस्तार करण्यात आला. आता चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत पोहोचलं आहे. येत्या 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगची इस्रोची योजना आहे. सर्व भारतीयांचे डोळे चांद्रयान 3 च्या चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगकडे लागले आहेत. 2019 साली चांद्रयान 2 मिशनमध्ये चंद्रावर सॉ़फ्ट लँडिंग करण्यात अपयश आलं होतं.

आता चांद्रयान 3 मिशनमध्ये मागच्या चुकांमधून धडा घेत बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहेत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्याच इस्रोच लक्ष्य आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरावा, अशी सर्वांची मनापासून इच्छा आहे.

भारताची जवळच्या मित्र देशाबरोबर स्पर्धा

कारण रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनी यशस्वी चंद्र मोहिमा केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या यानाच तिथे यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलय. पण दक्षिण ध्रुवावर अजूनपर्यंत कोणी गेलेलं नाहीय. भारत तिथे पोहोचणारा पहिला देश ठरु शकतो. पण आता स्पर्धा निर्माण झालीय. भारताच्या अत्यंत जवळच्या मित्र देशाची चांद्रमोहिम येत्या 11 ऑगस्टला लाँच होणार आहे.

दक्षिण ध्रुवावर पहिलं कोण पोहोचणार?

रशियाच ‘लुना 25’ मिशन येत्या 11 ऑगस्टला लाँच होणार आहे. 47 वर्षानंतर रशिया पहिल्यांदाच चंद्रावर यान उतरवणार आहे. ‘लुना 25’ च सॉफ्ट लँडिंग सुद्धा 23 ऑगस्टलाच दक्षिण ध्रुवावर होणार आहे. याच दिवशी भारताच्या चांद्रयान 3 चं लँडिंग आहे. आता फक्त प्रश्न हा आहे की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणार पहिला देश कोण ठरणार? ‘लुना 25’ प्रक्षेपण कुठून होणार?

रशियाच्या फार इस्ट भागातील अवकाश तळावरुन ‘लुना 25’ च प्रक्षेपण होणार आहे. दक्षिण ध्रुवावर बर्फ आणि पाणी असण्याची शक्यता आहे. रशियाच्या चांद्र मोहिमेचा सुद्धा तोच उद्देश आहे. बर्फ, ऑक्सिजनचा शोध घेणं हा रशियाच्या मोहिमेचा उद्देश आहे.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.