PM Modi Speech : जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होतील : मोदी

| Updated on: Aug 15, 2021 | 9:05 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्य दिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन ध्वज फडकावतील आणि देशातील जनतेला संबोधित करतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ कोविड नियमांच्या पालनासह होणार आहे.

PM Modi Speech : जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होतील : मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी परंपरेनुसार देशाच्या स्वातंत्र्य दिनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन ध्वज फडकावला आणि देशातील जनतेला संबोधित केलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा समारंभ कोविड नियमांच्या पालनासह झाला. त्यामुळे मोजक्या उपस्थितांसह हा कार्यक्रम संपन्न झाला. मात्र, हा संपूर्ण कार्यक्रम लाईव्ह दाखवल्यानं देशभरातील नागरिकांनी घरबसल्या हा स्वातंत्र्योत्सव पाहिला.

Live Updates of PM Narendra Modi speech on Independence Day 2021 India

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Aug 2021 09:00 AM (IST)

    देशाचं 25 वर्षांनंतरचं साध्य आजचा संकल्प असेल : मोदी

    25 वर्षांनंतर जे कुणी पंतप्रधान असतील ते या ठिकाणावरुन देशाने काय साध्य केलं हे सांगताना जे सांगतील ते आजचा मी सांगत असलेला संकल्प असेल : मोदी

  • 15 Aug 2021 08:49 AM (IST)

    भारताची ऊर्जा क्षेत्रातील मोठी घोषणा, ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’ राबवणार : मोदी

    नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनची घोषणा, भारताची ऊर्जा क्षेत्रातील मोठी प्रगती, जगात स्वच्छ उर्जासाठी भारताला ओळखलं जाईल : मोदी

  • 15 Aug 2021 08:47 AM (IST)

    भारतीय स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षापर्यंत देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करणार : मोदी

    भारतीय स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षापर्यंत देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच या दशकापर्यंत 450 गिगावॅट अपारंपारिक उर्जा निर्मितीचं लक्ष्य ठेवल्याचंही मोदींनी सांगितलं.

  • 15 Aug 2021 08:43 AM (IST)

    देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये आता मुलींनाही प्रवेश देणार : मोदी

    मुलींनाही समान संधी मिळाली पाहिजे. मुली कोणत्याच क्षेत्रात कमी नाही. त्यामुळे आता देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये आता मुलींनाही प्रवेश देणार आहे, अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली.

  • 15 Aug 2021 08:34 AM (IST)

    विविध क्षेत्रात अडथळे ठरणारे 15000 निर्बंध आम्ही संपवले : मोदी

    200 वर्षांपासून नकाशाचा कायदा अस्तित्वात होता. मॅपिंग असो, स्पेस असो, माहिती तंत्रज्ञान असो या सर्व क्षेत्रातील 15000 निर्बंध आम्ही संपवले आहेत.

  • 15 Aug 2021 08:28 AM (IST)

    भारतातील उत्पादकांनी त्यांचे उत्पादन भारताची ओळख असल्याचं लक्षात ठेवावं : मोदी

    “भारतातील उत्पादकांनी त्यांचे उत्पादन भारताची ओळख असल्याचं लक्षात ठेवावं. जगाच्या बाजारपेठेवर आपलं अधिराज्य असावं हे स्वप्न देशातील उत्पादकांनी पाहावं. सरकार त्यांच्यासोबत उभं असेल. सरकार देशातील स्टार्ट-अपसोबतही उभं आहे.”

  • 15 Aug 2021 08:22 AM (IST)

    देशात 75 वंदे भारत रेल्वे देशातील विविध भागांना जोडतील : मोदी

    देश 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना देशभरात 75 ‘वंदे भारत रेल्वे’ देशातील विविध भागांना जोडतील : मोदी

  • 15 Aug 2021 08:13 AM (IST)

    सध्या देशात 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती : मोदी

    मोदी म्हणाले, “वाढत्या लोकसंख्यामुळे कुटुंबात विभागणी होऊन गावांमध्ये शेतकऱ्यांकडील जमिनीचं प्रमाण कमी होतंय. हे मोठं आव्हान आहे. सध्या देशात 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे जितकं लक्ष द्यायला हवं होतं तितकं आधी दिलं गेलं नाही. आत्ता या शेतकऱ्यांवर लक्ष दिलं जातंय. ब्लॉक लेव्हलवर विअर हाऊस तयार करण्यावर भर देणार आहे.”

  • 15 Aug 2021 08:08 AM (IST)

    “देशात भांडवलशाही आणि समाजवादाची खूप चर्चा, पण सहकारवादही महत्त्वाचा”

    “देशात भांडवलशाही आणि समाजवादाची खूप चर्चा होते. पण देशात सहकारवादाचीही गरज आहे. यामुळे देशातील जनता विकासाचा भाग बनावा म्हणून सहकार क्षेत्र महत्त्वाचं आहे. सहकार हे एक संस्कार, प्रेरणा आणि सोबत चालण्याची वृत्ती आहे. म्हणूनच स्वतंत्र सहकार मंत्रालय बनवण्यात आलं.”

  • 15 Aug 2021 08:04 AM (IST)

    जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होतील : मोदी

    जम्मू काश्मीरमध्ये डिलिमिटेशन बोर्डाचं गठन झालंय, लवकरच तिथं विधानसभा निवडणुका होतील.

  • 15 Aug 2021 08:03 AM (IST)

    “लवकरच ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या सर्व राजधान्यांना रेल्वे मार्गाने जोडणार”

    लवकरच ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या सर्व राजधान्यांना रेल्वे मार्गाने जोडले जाईल. या राज्यांना देशाच्या विकासाचा भाग बनवावं लागेल. हे काम देशाच्या अमृतमहोत्सवाआधी पूर्ण करावं लागेल.

  • 15 Aug 2021 07:59 AM (IST)

    “आता ब्लॉक स्तरावर आधुनिक रुग्णालयं उभे करण्यावर भर”

    पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशातील प्रत्येकापर्यंत चांगल्या आरोग्याची व्यवस्था पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी आयुष्मान भारत योजनेत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहचवल्या जात आहेत, नागरिकांना स्वस्त औषधं उपलब्ध करुन दिले जात आहे. आता ब्लॉक स्तरावर आधुनिक रुग्णालयं उभे करण्यावर भर दिला जात आहे. पुढील काळात रुग्णालयांकडे स्वतःचे ऑक्सिजन प्लँट असतील.”

  • 15 Aug 2021 07:56 AM (IST)

    “देशातील 100 टक्के घरांमध्ये वीज आणि शौचालय”

    “देशातील 100 टक्के घरांमध्ये वीज पोहचली, 100 टक्के घरांमध्ये शौचालय निर्मितीसाठी प्रयत्न केले. आता देशातील प्रत्येक घरात पाण्याचा नळ देण्यासाठी काम करणार आहे,” असंही मोदी म्हणाले.

  • 15 Aug 2021 07:54 AM (IST)

    “100 टक्के गावांमध्ये रस्ते असावेत, प्रत्येकाला हक्काचं घर असावं”

    नरेंद्र मोदी म्हणाले, “उज्वला योजनेपासून आयुष्मानपर्यंत योजनांची ताकद सर्वसामान्यांना माहिती आहे. मात्र, इतक्यावरच थांबायचं नाहीये. 100 टक्के गावांमध्ये रस्ते असावेत, सर्वांकडे बँक खाते असावेत, सर्वांकडे आयुष्मान कार्ड असावे, घरकुल योजनेतून प्रत्येक हक्काच्या व्यक्तीला घर द्यायचं आहे.”

  • 15 Aug 2021 07:45 AM (IST)

    भारताने कोरोना लस तयार केली नसती तर काय झालं असतं? : मोदी

    भारताने कोरोना लस तयार केली नसती तर काय झालं असतं? मात्र, आज देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरू आहे. हे खरं आहे की आपण अनेक लोकांचा जीव वाचवू शकलो नाही. त्यामुळे हा काळा पाठ थोपटून घेण्याचा नाही. या काळात अनेक लहान मुलांच्या डोक्यावर हात फिरवणारे कोरोनाचा बळी ठरलेत, असंही मोदींनी नमूद केलं.

  • 15 Aug 2021 07:43 AM (IST)

    “देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम, म्हणूनच हा दिवस यापुढे साजरा करणार”

    देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम केली. म्हणूनच हा फाळणीचा दिवस यापुढे दरवर्षी साजरा केला जाईल. या दिवशी फाळणीमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांची आठवण केली जाईल, असंही मोदी म्हणाले.

  • 15 Aug 2021 07:41 AM (IST)

    “ऑलिंपिकमध्ये देशाचं नाव रोषण करणाऱ्या खेळाडूंसाठी टाळ्या”

    मोदी म्हणाले, “देशात पूर आणि भूस्खलनाच्या दुर्दैवी घटना घडल्यात. या घटनांमध्ये प्रभावित सर्वांसोबत केंद्र सरकार उभं आहे. ऑलिंपिकमध्ये देशाचं नाव रोषण करणाऱ्या खेळाडूंच्या सन्मानासाठी देशवासीयांना काही वेळ टाळ्या वाजवाव्यात.”

  • 15 Aug 2021 07:37 AM (IST)

    पंतप्रधान मोदींकडून महात्मा गांधींपासून नेहरुंपर्यंत सर्व स्वातंत्र्यवीरांना अभिवादन

    पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना, स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांना नमन. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना देश आठवत आहे. या सर्वांना वंदन करतो.”

  • 15 Aug 2021 07:33 AM (IST)

    पंतप्रधान मोदींना लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर

    पंतप्रधान मोदींना लाल किल्ल्यावर गार्ड ऑफ ऑनर

  • 15 Aug 2021 07:30 AM (IST)

    पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावला

  • 15 Aug 2021 07:21 AM (IST)

    पंतप्रधान मोदींकडून राजघाटवर महात्मा गांधींना नमन

    पंतप्रधान मोदींकडून राजघाटवर महात्मा गांधींना नमन

  • 15 Aug 2021 07:11 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विट करत देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या सदिच्छा

    पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ट्विट करत देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या सदिच्छा.

  • 15 Aug 2021 07:03 AM (IST)

    थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर उपस्थित होणार

    75 व्या स्वंतत्र्य दिनाच्या समारंभाची लाल किल्ल्यावर तयारी पूर्ण झालीय. काही वेळातच पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर येऊन राष्ट्रध्वज फडकावतील आणि देशवासियांना संबोधित करतील.

  • 15 Aug 2021 06:25 AM (IST)

    लाल किल्ल्यावर कधी काय होणार, संपूर्ण वेळापत्रक

    • सकाळी 6.55 वाजता संरक्षण सचिव येतील.
    • सकाळी 6.56-6.59 वाजता सीएएस/सीएनएस/सीओएएस/सीडीएस उपस्थित होतील.
    • सकाळी 7.08 वाजता संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट येतील.
    • सकाळी 7.11 वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह येतील.
    • सकाळी 7.18 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आगमन होईल.
    • यानंतर गार्ड ऑफ ऑनर दिलं जाईल.
    • सकाळी 7.30 वाजता पंतप्रधान मोदी राष्ट्रीय ध्वज फडकावतील.
    • राष्ट्रगीत. (हेलिकॉप्टरमधून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव)
    • सकाळी 7.33 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला संबोधित करतील.
    • सकाळी 9.30 वाजेपर्यंत कार्यक्रम समाप्त होईल.
    • राष्ट्रपति रामनाथ कोविंद सकाळी 11.30 वाजता नॅशनल वॉर मेमोरियल येथे जातील. तेथे सीडीएस आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित असतील.

Published On - Aug 15,2021 6:20 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.