AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोरोना पॉझिटिव्ह, एम्स रुग्णालयात दाखल

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. लोकसभेच्या मीडिया सेलने ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कोरोना पॉझिटिव्ह, एम्स रुग्णालयात दाखल
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण
| Updated on: Mar 21, 2021 | 3:47 PM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढतेय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. लोकसभेच्या मीडिया सेलने ओम बिर्ला यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करुन घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर ओम बिर्ला यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.(Lok Sabha Speaker Om Birla Corona Positive, started treatment at AIIMS Hospital in Delhi)

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नव्हती. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर बिर्ला यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. कोरोना चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्यांना 20 मार्च रोजी एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतातील कोरोनाची स्थिती

भारतात गेल्या 24 तासात 43 हजार 846 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 2021 मध्ये एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांचा हा सर्वाधिक आकडा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, नव्या रुग्णांसह देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 15 लाख 99 हजार 130 वर पोहोचली आहे. तर देशात सध्या 3 लाख 9 हजार 87 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आदित्य यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. राज्यात पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना फोफावत आहे. आता तर हा कोरोना थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबात शिरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

IPS अधिकाऱ्यांनाही प्रश्न पडला, कोव्हिशिल्ड की कोवॅक्सीन, कोणती लस चांगली?

Corona Update : भारतातील 8 राज्यांनी चिंता वाढवली, महाराष्ट्रासह कोणत्या राज्यांचा समावेश?

Lok Sabha Speaker Om Birla Corona Positive, started treatment at AIIMS Hospital in Delhi

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.