लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आता देशाचे नवे सेना प्रमुख; त्यांच्या नियुक्तीसाठी सरकारचा ग्रीन सिग्नल

आपल्या ३७ वर्षांच्या सेवेत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. यामध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुकही करण्यात आले होते.

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे आता देशाचे नवे सेना प्रमुख; त्यांच्या नियुक्तीसाठी सरकारचा ग्रीन सिग्नल
मनोड पांडये यांची सेना प्रमुख पदी निवडImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 8:00 PM

 नवी दिल्लीः  लेफ्टिनेंट जनरल मनोज पांडे यांची आता देशाच्या सेना प्रमुखपदी त्यांची नव्याने नियुक्ती केली जाणार आहे. मनोज पांडे सेना प्रमुख बनणारे हे पहिले इंजिनीयर आहेत. त्यांच्या नियुक्तीला नुकताच केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. या महिन्याच्या अखेरीस 30 एप्रिल रोजी लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्याकडे भारतीय लष्कराची कमान सोपवण्यात येणार आहे. सध्याचे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे या महिन्याच्या अखेरीपर्यंत निवृत्त होणार असून त्यानंतर मनोज पांडे यांच्याकडे हा कार्यभार सोपवला जाणार आहे.

कोण आहेत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे?

  1. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची डिसेंबर 1982 मध्ये अभियंता कॉर्प्समध्ये नियुक्ती करण्यात आली होती.
  2. 1982 मध्ये ज्यांची भरती झाली आहे, त्यामध्ये मनोज पांडे यांचे नाव होते.
  3. त्याकाळातील ती बॅच स्टाफ कॉलेज, कॅम्बरले (यूके) चा पदवीधर आहे आणि त्याने आर्मी वॉर कॉलेज,
  4. महू आणि दिल्लीतील नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये हायर कमांडचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
  5. अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ होते.

ऑपरेशन विजय ते ऑपरेशन पराक्रम

आपल्या ३७ वर्षांच्या सेवेत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रममध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. यामध्ये त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुकही करण्यात आले होते.

वरिष्ठ अधिकारी निवृत्त

सेना दलातील काही उच्च पदस्थ अधिकारी गेल्या तीन महिन्यात निवृत्त झाले आहेत, त्यामध्येसुद्धा पांडये हे सगळ्यांमध्ये ज्येष्ठ आहेत. याआधी आर्मी ट्रेनिंग कमांडचे (एआरटीआरएसी) प्रमुख लेफ्टनंट जनरल राज शुक्ला 31 मार्च रोजी निवृत्त झाले आहेत. तर जानेवारी महिन्यात काही वरिष्ठ अधिकारी निवृत्त झाले आहेत. लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती आणि लेफ्टनंट जनरल वायके जोशी हे 31 जानेवारीला निवृत्त झाले आहेत.

यशस्वी नेतृत्व

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी 39 वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत वेस्टर्न थिएटरमध्ये इंजिनियर ब्रिगेड, नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, लडाख सेक्टरमधील माउंटन डिव्हिजन आणि ईशान्येकडील कॉर्प्सचे नेतृत्व केले आहे. ईस्टर्न कमांडचा पदभार स्वीकारण्यापूर्वी ते अंदमान आणि निकोबार कमांडचे कमांडर-इन-चीफ म्हणूनही त्यांनी पदभार यशस्वीपणे सांभाळला होता.

संबंधित बातम्या

Supriya Sule : सिल्व्हर ओकवरील हल्ला म्हणजे माझ्या आईवर हल्ला, एसटी कर्मचाऱ्यांच्या राड्यानंतर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

अकरावीच्या प्रवेशाचे नियोजित वेळापत्रक जाहीर ; जाणून घ्या तपशीलवार माहिती

Sangli Sabha : सांगलीत महापालिका महासभेत प्रचंड गदारोळ, महिला नगरसेवकांनी राजदंड पळवला

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.