काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण?; काँग्रेसचा ‘हा’ बडा नेता काय म्हणाला?

काँग्रेस पक्षात सध्या अध्यक्षपदाच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक होत असली तरी निवडणूक प्रक्रियेवरच अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण?; काँग्रेसचा 'हा' बडा नेता काय म्हणाला?
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 12:02 PM

नवी दिल्लीः राजकीय घडामोडींच्या या धामाधूमीत पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्री (Madhusudan Mistry) यांनी मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत खुलासा केला आहे. ही निवड प्रक्रिया पूर्णपणे खुली आणि पारदर्शी असल्यामुळे पक्षाकडे आता अध्यक्षनिवडीबाबत लपवण्यासारखे काहीच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसमध्ये (Congress) एकीकडे अध्यक्ष पदाच्या निवडीबाबत जोरदार चर्चा सुरु असून भावी अध्यक्ष (congress president ) कोण असा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दीर्घ कालखंडानंतर गांधी कुटुंबीय सोडून हे पद इतर व्यक्तीला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पक्षात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे, मात्र याबाबत अनेक सवालही उपस्थित केले जात आहेत.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुसूदन मिस्त्रींनी सांगितले की, अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आता जोरदार तयार केली जात आहे. या निवडणुकीत 9 हजार मतदार काँग्रेस अध्यक्ष पदासाठी मतदान करणार आहेत.

काँग्रेस अध्यक्ष पदासाची निवडणूक ही पूर्णपणे स्वतंत्र प्रक्रिया असून त्यासाठी पक्षाकडे आता लपवण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे इथून पुढेही ही प्रक्रिया स्वतंत्र असणार असल्याचे मत मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.

मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, ज्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अर्थात काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आहे,ते 20 सप्टेंबरपूर्वी प्रतिनिधींची यादी पाहू शकतात.

त्याचवेळी, त्यांना उमेदवारीसाठी 10 प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधींचा पाठिंबा दर्शवावा लागेल.

ज्यांना काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायचा आहे ते 20 सप्टेंबरपूर्वी काँग्रेस प्रतिनिधींची यादी पाहू शकतात, असंही मिस्री यांनी सांगितले आहे.

अध्यक्षपदासाठी अर्ज भरताना मात्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या 10 प्रतिनिधींचा पाठिंबा दर्शवावा लागणार आहे.

प्रदेश काँग्रेस कमिटीचे 9000 मतदार काँग्रेस अध्यक्षाची निवड करणार आहेत. त्याचवेळी, काँग्रेस कार्यकारिणीच्या 23 सदस्यांपैकी 12 सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. तर 11 सदस्यांना नामनिर्देशित केले जाईल.

काँग्रेस कार्यकारिणीच्या निवडून आलेल्या 12 सदस्यांपेक्षा अधिक उमेदवार असतील तर मात्र निवडणूक होणार आहे. यामध्ये एकाच नावावर एकमत झाल्यास निवडणूक होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची सूचना 22 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. तर 24 ते 30 सप्टेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रांची छाननी करुन 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होण्याची शक्यता आहे.

'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.