रेल्वे दुर्घटनेवर बाबा बागेश्वर म्हणाले..; अपघाताच्या संकेताविषयी त्यांनी स्पष्टच सांगितले…
अनेक शास्त्रज्ञ, अनेक भूगर्भशास्त्रज्ञ गुप्त मार्गाने आपल्याकडे येत असतात. पण रडल्याशिवाय आई सुद्धा पोराला दूध पाजत नाही तसेच कुणी आमच्याकडे आल्याशिवाय आम्ही त्याचे उत्तर कसं सांगणार असंही त्यांनी यावेळी सांगितले.
ओडिशा : रेल्वेच्या आज झालेल्या अपघातामुळे आज अनेकांना जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. आज मोठा अपघात झाल्यानंतर बाबा बागेश्वर यांच्याशीही पत्रकारांनी संपर्क साधत त्यांना अनेक सवाल उपस्थित करण्यात आले. ओडिशा दुर्घटनेवर बाबा बागेश्वर धाम पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले की, या दुर्घटनेमुळे मी प्रचंड दुःखी आहे.त्यामुळे अपघातातील जखमींनी लवकर बरे व्हावे तसेच त्यांना प्रशासनाकडूनही तात्काळ मदत जाहीर मिळावी अशी इच्छाही त्यांना यावेळी व्यक्त केली आहे.
ओरिसा रेल्वे अपघातानंतर आज पत्रकारांनी बाबा बागेश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना अनेक सवाल उपस्थित करत म्हटले की, या प्रकारचे जर अपघात होत असतील तर तुमची शक्ती या अशा घटनेचे संकेत देऊ शकते का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
त्यावर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी होकारार्थी उत्तर देत पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी होय असं उत्तर दिले.
याबाबत बोलताना बाबा बागेश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळणे ही एक गोष्ट आहे पण यासारखे मोठ्या दुर्घटना टाळणे ही त्यातील दुसरी गोष्ट आहे.
महाभारत घडणार हे भगवान श्रीकृष्णाला माहीत होते पण ते टाळू शकले नाहीत.वाऱ्याच्या वेगाचा संबंध आहे म्हणून आपली शक्ती संकेत देऊ शकते असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता आपण राष्ट्रहितासाठी प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दहशतवादी हल्ला असो किंवा अंतर्गत कोणतीही गोष्ट असो, त्यासाठी आम्ही आमची शक्ती वापरत असतो. तसेच देशाच्या हितासाठीही आम्ही आमची शक्ती वापरत राहू असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
अनेक शास्त्रज्ञ, अनेक भूगर्भशास्त्रज्ञ गुप्त मार्गाने आपल्याकडे येत असतात. पण रडल्याशिवाय आई सुद्धा पोराला दूध पाजत नाही तसेच कुणी आमच्याकडे आल्याशिवाय आम्ही त्याचे उत्तर कसं सांगणार असंही त्यांनी यावेळी सांगितले.
ओरिसा दुर्घटनेवर बाबा बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की, अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी 2 मिनिटे मौन पाळण्यात आले तसेच बालाजीच्या सैन्याने तिथे जावे आणि जखमींना मदत करावी असंही त्यांना यावेळी स्पष्ट केले.