लग्नानंतर 24 तासात नववधूला वैधव्य, कार सजवण्यासाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू

भरधाव कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात नवरदेवाची गाडी विजेच्या खांबाला धडकली, उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यू झाला ( Newly Married Man Dies in Car Accident)

लग्नानंतर 24 तासात नववधूला वैधव्य, कार सजवण्यासाठी गेलेल्या नवरदेवाचा अपघाती मृत्यू
सोनू आणि ज्योती यांच्या लग्नातील फोटो
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 12:22 PM

भोपाळ : डोक्यावर अक्षता पडताच नवऱ्यासोबत सुखी संसाराची चित्र पाहणाऱ्या नववधूची स्वप्नं काही तासांतच विरली. ऐन लग्नाच्या दिवशीच तिच्या भाळी वैधव्याचा शिक्का लागला. लग्नानंतर कार अपघातात नवरदेवाचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. (Madhya Pradesh Bhind Newly Married Man Dies in Car Accident within 24 hours of Wedding)

भिंड शहरात राहणारा सोनू वाल्मिकी किन्नौठा गावात वरात घेऊन आला. रात्री सोनू आणि ज्योती यांचा विधीवत विवाह सोहळा पार पडला. दुसऱ्या दिवशी सकाळी वधूपक्षाकडून ज्योतीच्या पाठवणीची तयारी सुरु होती. जड अंतःकरणाने माहेरच्या मंडळींकडून ज्योतीची विदाई केली जात होती.

कारला ओव्हरटेक करताना अपघात

त्याचवेळी नवरदेव सोनूने ज्योतीची पाठवणी सजवलेल्या गाडीने करण्याचा मानस बोलून दाखवला. तो आपल्या भावांसोबत कार सजवण्यासाठी गेला. नवरदेवाची गाडी अटेर-पोरसा हायवेवर पोहोचली. त्यावेळी एका भरधाव कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात विजेच्या खांबाला धडकली. अपघातानंतर गाडीतून किंकाळ्या निघाल्या.

अपघातात कारचे दोन तुकडे

कारची धडक इतकी जबरदस्त होती, की तिचे जागीच दोन तुकडे झाले. स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. गंभीर जखमी नवरदेवाला जवळच्या रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्याला तात्काळ ग्वाल्हेरला नेण्यास सांगितले. परंतु वाटेतच त्याने अखेरचा श्वास घेतला. गाडीतील इतर नातेवाईकही अपघातात जखमी झाले आहेत.

दोन्ही कुटुंबांवर शोककळा

नवरदेवाच्या मृत्यूची बातमी नववधू आणि तिच्या नातेवाईकांना समजताच एकच सन्नाटा पसरला. ज्या घरात काही काळापूर्वी हसण्या-खिदळण्याचं आणि आनंदाचं वातावरण होतं, तिथेच आक्रोश सुरु झाला. अतिदुःखाने नववधूची शुद्ध हरपली होती. आपल्या लेकीवर 24 तासात वैधव्याची वेळ का आली, असा प्रश्न जो-तो विचारत होता. शोकाकुल वातावरणात नवरदेवाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

जियेंगे साथ-साथ, मरेंगे साथ-साथ

लगीनगाठ बांधून घरी निघालेल्या नवदाम्पत्याच्या गाडीला ट्रकची जोरदार धडक बसून अमेरिकेत दोन वर्षांपूर्वी भीषण अपघात झाला होता. या अपघातात नववधू आणि नवरदेव अशा दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. अमेरिकेतील टेक्सासमध्ये (Texas) घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने अख्खं जग हळहळलं होतं.

संबंधित बातम्या :

लग्नानंतर काही मिनिटात नवदाम्पत्याच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

गर्लफ्रेण्डला अंडरवॉटर प्रपोज करण्याचा प्रयत्न, तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू

(Madhya Pradesh Bhind Newly Married Man Dies in Car Accident within 24 hours of Wedding)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.