AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khargone Accident : बस 50 फूट उंच पुलावरून नदीत कोसळली, 15 प्रवाशांचा जागीचं मृत्यू

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख आणि गंभीर जखमींना ५० हजार तर किरकोळ जखमी प्रवाश्यांना २५ हजार रूपयांची मदत जाहीर मध्यप्रदेश सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

Khargone Accident : बस 50 फूट उंच पुलावरून नदीत कोसळली,  15 प्रवाशांचा जागीचं मृत्यू
| Updated on: May 09, 2023 | 12:47 PM
Share

नवी दिल्ली : मध्यप्रदेश (MadhyaPradesh) राज्यातील खरगोनमध्ये (Khargone Accident) भीषण अपघात झाला आहे. बस 50 फूट उंच पुलावरून नदीत कोसळली असल्याची माहिती मिळाली आहे. दुर्घटनेत 15 प्रवाशांचा मृत्यू आहे. तर 25 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून अनेक प्रवासी गंभीर आहेत. आज सकाळी साडे आठ वाजता बुढार नदीवर अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस डोंगरगाव आणि दसंगादरम्यान असलेल्या बुढार नदीवरील (budhar river) पुलाचा कठडा तोडून नदीत कोसळली. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी तिथं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती.

मध्यप्रदेश सरकारची मदत जाहीर

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख आणि गंभीर जखमींना ५० हजार तर किरकोळ जखमी प्रवाश्यांना २५ हजार रूपयांची मदत जाहीर मध्यप्रदेश सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. 25 जखमींपैकी अनेकजण गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, माजी मुख्यमंत्री कमलनाख यांनी दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

नेमका अपघात कशामुळे झाला ?

या सगळ्या प्रकरणाची पोलिस चौकशी करण्यात येणार आहे. अपघातस्थळी लोकांची गर्दी असून बस त्या ठिकाणीहून थोडीसी बाहेर काढण्यात आली आहे. जखमींवरती जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. ज्या परिस्थिती नाजूक आहे अशा अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी हा ज्यावेळी अपघात झाला, तेव्हा घटनास्थळी अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी भेटी दिल्या आहेत.

मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर ओळख पटवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.