“महाराष्ट्रातील नेत्यांविरोधात सीमाभागातील मराठी माणूस पेटला”; बेळगावच्या मराठी माणसांनी राष्ट्रीय पक्षांना इशारा दिला..

खासदार संजय राऊत यांनी मराठी उमेदवारांसाठी रोड शो केल्याने आता बेळगावमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. 

महाराष्ट्रातील नेत्यांविरोधात सीमाभागातील मराठी माणूस पेटला; बेळगावच्या मराठी माणसांनी राष्ट्रीय पक्षांना इशारा दिला..
Follow us
| Updated on: May 03, 2023 | 9:54 PM

बेळगाव : कर्नाटकच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एकीकडे युती आणि आघाडीचे चित्र असताना दुसरीकडे मात्र कर्नाटकात एकमेकांविरोधात निवडणुका लढवल्या जात असल्याने आता सीमाभागातील मराठी माणसांकडून महाराष्ट्रातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. सीमाभागातील मराठी जनतेने आता आम्हाला सीमाभागातून आता महाराष्ट्रात जाण्याचे दिवस जवळ आले आहेत.

तर दुसरीकडे मराठी नेत्यांनी आपापल्या पक्षासाठी आता बेळगावसह कर्नाटकमध्ये येऊन प्रचार करत आहेत. त्यामुळे अशा मराठी नेत्यांच्याएवढी अशी लाच्छांनास्पद गोष्ट नाही असा घणाघातही मराठी मतदारांनी व्यक्त केली आहे.

भाजपकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण कर्नाटकातील निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत.

मात्र मराठी माणसांनी बेळगावमधील सीमाभागात येऊन मराठी उमेदवारांविरोधात येऊन जर आपापल्या पक्षासाठी प्रचार करत असतील त्यासारखी दुर्देवी गोष्ट कुठली नाही अशी खंतही मराठी माणसांनी व्यक्त केली आहे. एकीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे चित्र आहे तर दुसरीकडे कर्नाटकात मात्र काँग्रेसचे स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा असल्याने सीमाभागातील मराठी माणसांकडून मराठी नेत्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

मागील 66 वर्षांपासून सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात जाण्यासाठी लढा देत आहे. मात्र आता हा संघर्ष करुन आता महाराष्ट्रात जाण्याचे दिवस जवळ आल्याचे भावनाही मराठी मतदारांनी व्यक्त केली आहे.

मात्र मराठी नेत्यांनी बेळगावमध्ये येत मराठी उमेदवारांविरोधातच प्रचार करत असल्याने त्या गोष्टीसारखे दुसरे दुःख नाही अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

खासदार संजय राऊत यांनी मराठी उमेदवारांसाठी रोड शो केल्याने आता बेळगावमधील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.  संजय राऊत यांनी बेळगावमध्ये येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.