महाराष्ट्रातील पहिली ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ विशाखापट्टणमला दाखल, ऑक्सिजन भरण्यास 20 तासांचा अवधी लागणार

दरम्यान या संपूर्ण प्रक्रियाला किमान 20 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (Maharashtra First 'Oxygen Express' Reach at Visakhapatnam)

महाराष्ट्रातील पहिली 'ऑक्सिजन एक्सप्रेस' विशाखापट्टणमला दाखल, ऑक्सिजन भरण्यास 20 तासांचा अवधी लागणार
oxygen express
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 9:28 AM

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो आहे. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत रेल्वेद्वारे अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याला ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी 7 मोठे टँकर घेऊन जाणारी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज पहाटे विशाखापट्टणम येथे दाखल झाली आहे. यातील टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी 20 तासांचा अवधी लागणार आहे.  (Maharashtra First ‘Oxygen Express’ Reach at Visakhapatnam)

पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस पहाटे दाखल

राज्यातील पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस 7 रिकामे टँकर घेऊन 19 एप्रिलला रवाना झाली. त्यानंतर आज पहाटे 4 वाजता ती विशाखापट्टणम येथे दाखल झाली आहे. यात ऑक्सिजन भरण्यासाठी तब्बल 20 तासांचा कालावधी लागणार आहे. आंध्रप्रदेशातील विशाखा स्टील प्लांटमधून महाराष्ट्राला ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.  या प्लांटमधील अधिकाऱ्यांनी या टँकरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्यानुसार, सुरुवातीला रेल्वे गाड्यातून हे सात टँकर खाली उतरवले जाते. त्यानंतर त्यात ऑक्सिजन भरला जाईल. दरम्यान या संपूर्ण प्रक्रियाला किमान 20 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

ऑक्सिजन भरल्यानंतर रेल्वेतील इंजिनिअरच्या मदतीने हे टँकर व्यवस्थितरित्या रेल्वेवर चढवले जातील. त्यानंतर रात्रीपर्यंत ती एक्सप्रेस पुन्हा परत महाराष्ट्रात येण्यासाठी रवाना होईल, अशी माहिती मिळत आहे.

5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजन उपलब्ध होणार

या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या 5 दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याप्रमाणे राज्याच्या प्रशासनाने वेगवेगळ्या पर्यायांची चाचपणी करत रेल्वे मार्गे ऑक्सिजन वाहतूक करता येईल असं केंद्र शासनाला सुचवलं होतं. त्यानुसार ही एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजुरी दिली. यापुढील काळात ऑक्सिजनच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे.

‘ऑक्सिजन एक्सप्रेस’चा मार्ग कसा असणार?

कळंबोली येथून विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविणे अधिक व्यवहार्य असल्याने 2 दिवसात येथिल प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर आज प्रत्यक्ष रिकामे टँकर सपाट वॅगनवर ‘रोल ऑन-रोल ऑफ’ पद्धतीने चढवून सायंकाळी 7 वाजता ऑक्सिजन एक्स्प्रेस रवानाही करण्यात आली. हे प्रत्येकी 16 मे. टन. द्रवरुप ऑक्सिजन वाहतुकीची क्षमता असलेले विशेष टँकर आहेत. आयनॉक्स एअर प्रॉडक्ट्स, ताईयो निप्पॉन सॅन्सो इं., एअर लिक्विड, लिंडे आदी कंपन्यांचे हे टँकर आहेत. नेहमीच्या पुणे-सिकंदराबाद- विजयवाडा रेल्वेमार्गा वर पुणे दरम्यान बोगदे असल्यामुळे ओव्हरहेड वायरची उंची तुलनेत कमी होत असल्याने या मार्गावरुन ऑक्सिजनचे टँकर वाहून नेणे शक्य नव्हते. त्यामुळे तुलनेत लांबचा असला तरी व्यवहार्य असा सूरत- नंदूरबार- जळगाव- नागपूर असा लोहमार्ग निवडण्यात आला आहे. (Maharashtra First ‘Oxygen Express’ Reach at Visakhapatnam)

संबंधित बातम्या : 

Oxygen Express : देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ला अनिल परबांनी दाखवला हिरवा झेंडा

केंद्र सरकारची कपटनीती; महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन आणायला गेलेल्या एक्स्प्रेस ट्रेनचा खोळंबा: अरविंद सावंत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.