दोन दिवस तीन अपघात, गुजरात-महाराष्ट्र-बंगाल, 28 मृत्यू, थंडी ठरतेय काळरात्र?

पश्चिम बंगालच्या जलपायगुडी येथे रात्री एक भीषण अपघात झाला. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. | Major road accidents

दोन दिवस तीन अपघात, गुजरात-महाराष्ट्र-बंगाल, 28 मृत्यू, थंडी ठरतेय काळरात्र?
Follow us
| Updated on: Jan 20, 2021 | 9:51 AM

उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर पेट्रोल भरून पेट्रोल पंपाच्या बाहेर पडणाऱ्या स्विफ्ट कारला टँकरने मागच्या बाजूने धडक दिल्याने स्विफ्ट गाडीचा चक्काचुर झाला आहे. या अपघातात (Road accident) प्रतीक सोनावणे हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याचा उपचारासाठी खासगी वाहनाने नळदुर्ग ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंर टँकरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. सध्या नळदूर्ग पोलीस फरार टँकर चालकाचा शोध घेत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये दाट धुक्यामुळे डंपरमधील खडी कारवर उलटली

पश्चिम बंगालच्या जलपायगुडी येथे मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला. येथील धुपगुरी जिल्ह्यात हा अपघात झाला. याठिकाणी एक खडी भरलेला डंपर रस्त्यावरुन जात होता. एक कार या डंपरच्या उलट्या बाजूला जात होती. मात्र, ही कार जवळ आल्यावर डंपर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा डंपर खडीसह कारवर उलटला. कारमधील सर्व लोक या खडीखाली गाडले गेले. याशिवाय, या भागात दाट धुक्यामुळे अनेक गाड्या एकमेकांना धडकल्या आहेत. या सर्व अपघातांमध्ये मिळून जवळपास 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण गंभीर जखमी झाले आहेत.

सुरतमध्ये फूटपाथवर झोपलेल्या मजुरांना डंपरने चिरडलं, 15 जणांचा मृत्यू

गुजरातच्या सुरतमध्ये (Surat Accident) सोमवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली (Truck Crushes 22 Labours Sleeping On Footpath). येथे एका डंपरने लहान मुलांसह 22 जणांना चिरडले. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी आहेत. जखमींना सध्या सुरतच्या स्मीमेर रुग्णालयात (SMIMER Hospital) दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व मजूर होते आणि रात्री रस्त्याच्या कडेला फूटपाथवर झोपलेले होते. झोपेतच या मजुरांवर काळ आला आणि 15 जणांसाठी कालची रात्र अखेरची ठरली.

संबंधित बातम्या:

RIP Pista : ‘बिग बॉस’ची क्रू मेंबर पिस्ता धाकडचा दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं मृत्यू

संक्रांत साजरी करण्यासाठी गोव्याला जाताना भीषण अपघात, दहा महिलांचा मृत्यू

VIDEO | काँग्रेस आमदाराच्या गाडीला भीषण अपघात, कारचा चक्काचूर

मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटले, मर्सिडीज दुभाजकावर आदळून मुंबईत अपघात

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.