Hyderabad : काराकल – आयकॉम भागीदारीतून अत्याधुनिक लघु शस्त्रास्त्र उत्पादन केंद्राचे उद्घाटन
मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) च्या IComm कंपनीने आज हैदराबादमध्ये जागतिक दर्जाचे लघु शस्त्रास्त्र निर्मिती केंद्र सुरू केले. हे 'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत' या मोहिमांचा भाग आहे. या केंद्रात Caracal कंपनीच्या आधुनिक शस्त्रास्त्रांचे उत्पादन केले जाईल, ज्याचा उपयोग भारतीय सशस्त्र दलांना आणि जगभरातील देशांना होईल.

देशाच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारे जागतिक दर्जाचे लघु शस्त्रास्त्र निर्मिती केंद्र सोमवारी मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) ग्रुपची कंपनी IComm ने सुरू केले. IComm च्या एकत्रित अभियांत्रिकी विभागाच्या आवारात या शस्त्रास्त्र निर्मिती केंद्राचं IComm टेली लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुमंत पातुरु आणि Caracal चे CEO हमद अल अमेरी यांच्या संयुक्त उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं.
‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेचा भाग म्हणून या ठिकाणी तयार होणारी शस्त्रास्त्रे भारतीय सशस्त्र दलं, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलं (CAPFs), सशस्त्र पथके, राज्य पोलिस बलं, SPG अशा अनेक संस्थांच्या गरजा पूर्ण करतील. तसेच Caracal ही कंपनी जगभरातील विविध देशांना शस्त्रास्त्रांची निर्यात करण्यासाठी या हैदराबादमधील केंद्राचा उपयोग करेल. UAE-स्थित ही कंपनी भारताला प्रथमच लघु शस्त्रास्त्र निर्मितीसाठी तंत्रज्ञान पुरवते आहे.
Caracal आणि IComm यांच्या हैदराबादमधील केंद्रात मिशन-प्रूव्हन CAR 816 क्लोज-क्वार्टर्स बॅटल रायफल (5.56x45mm), लक्ष्य भेदण्यास सक्षम CAR 817 असॉल्ट रायफल (7.62x51mm), हलकी CSR 338, 308 बोल्ट-अॅक्शन स्नायपर रायफल्स, अचूक CSR 50 बोल्ट-अॅक्शन अँटी-मटेरियल स्नायपर रायफल (12.7x99mm), आधुनिक CMP 9 सबमशीन गन (9x19mm), तसेच विविध प्रकारची Caracal EF, Caracal F Gen 2 कॉम्पॅक्ट पिस्तुले तयार केली जातील.

World-class small arms manufacturing facility
या वेळी बोलताना IComm टेली लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुमंत पातुरु म्हणाले की, हे उत्पादन केंद्र भारतीय संरक्षण दलांसाठी त्यांच्या कटिबद्धतेचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनावरील विश्वासाचे प्रतीक आहे. IComm मध्ये आम्ही केवळ भारतासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी उपयोगी ठरेल अशी शस्त्रास्त्रे तयार करत आहोत. Caracal बरोबर झालेल्या ऐतिहासिक तांत्रिक हस्तांतरण (ToT) कराराअंतर्गत आमचे हे केंद्र आधुनिक आणि व्यापक श्रेणीतील शस्त्रास्त्रांचे उत्पादन केंद्र म्हणून कार्य करेल, असेही त्यांनी सांगितले. हे भारत-UAE संरक्षण सहकार्यातील एक मैलाचा दगड ठरेल. विश्वसनीय आणि दूरदृष्टी असलेल्या भागीदार Caracal बरोबर आम्ही केवळ जागतिक दर्जाची शस्त्रास्त्रेच नव्हे तर आत्मनिर्भर भारताचाही पाया मजबूत करीत आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
Caracal चे CEO हमद अल अमेरी म्हणाले की, IComm-Caracal लघु शस्त्रास्त्र निर्मिती केंद्राचा शुभारंभ हा भारतीय बाजारपेठ आणि संरक्षण उद्योगाला पाठबळ देण्याच्या आमच्या प्रयत्नांतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. IComm ही जागतिक दर्जाची उत्पादन कौशल्ये आणि राष्ट्रीय आत्मनिर्भरतेविषयीची दृढ निष्ठा असलेली अत्यंत प्रभावी आणि विश्वसनीय भागीदार असल्याचे त्यांनी सांगितले. “UAE कडून भारतात झालेले पहिले लघु शस्त्रास्त्र तंत्रज्ञान हस्तांतरण हे IComm-Caracal शस्त्रास्त्र निर्मिती केंद्र सुरू होण्यामागील कारण ठरले. हे उत्पादन केंद्र पंतप्रधान मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे प्रतीक आहे आणि आमच्या कटिबद्धतेचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. भारतीय संरक्षण प्रणालीतील आमच्या भूमिकेचा विस्तार झाल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो,” असेही अमेरि म्हणाले.